स्वच्छता कर्मचाऱ्यांना घ्यावे लागणार गाव दत्तक
By Admin | Updated: October 20, 2014 23:14 IST2014-10-20T23:14:12+5:302014-10-20T23:14:12+5:30
अस्वच्छतेमुळे होणारी रोगराई पाहून शासनाने निर्मल ग्राम अभियानाची सुरूवात केली. परंतु या अभियानाला अधिकारी, कर्मचारीच पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रतिसाद देत नसल्याचे समजल्याने आता निर्मल भारत

स्वच्छता कर्मचाऱ्यांना घ्यावे लागणार गाव दत्तक
युनिसेफचा निर्णय : निर्मल ग्रामांसाठी घेतला पुढाकार
नरेश रहिले - गोंदिया
अस्वच्छतेमुळे होणारी रोगराई पाहून शासनाने निर्मल ग्राम अभियानाची सुरूवात केली. परंतु या अभियानाला अधिकारी, कर्मचारीच पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रतिसाद देत नसल्याचे समजल्याने आता निर्मल भारत अभियानाच्या अंमलबजावणीत कर्मचाऱ्यांना जन्मगाव व कार्यक्षेत्रातील एक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी दत्तक घ्यावे लागणार आहे.
निर्मल भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठक लोणावळा येथे घेण्यात झाली होती. युनिसेफच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या बैठकीत उपायुक्त विकास, भारत निर्माणचे अधीक्षक अभियंता, पाणी व स्वच्छता अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता, सर्व जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामधील सल्लागार तज्ञ सहभागी झाले होते.
सदर कार्यशाळेत झालेल्या चर्चेदरम्यान पाणी पुरवठा जे प्रधान सचिव यांनी उपस्थित अधिकारी सल्लागार व तज्ज्ञांना आवाहन करून स्वच्छता विभागात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव व जन्म गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी दत्तक घेण्याचा निर्धार करावा असे आवाहन केले. त्यानुसार सदर पत्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता मिशनमध्ये कार्यरत सर्व अधिकारी, सल्लागार तज्ञ यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव व जन्म गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश दिले आहे.