स्वच्छता सर्वेक्षणात गोंदिया पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:23 IST2018-06-25T22:22:48+5:302018-06-25T22:23:02+5:30
स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्र्धेत गोंदिया शहर पास झाले आहे. गोंदियाने या स्पर्धेत देशातून ७६ तर राज्यात १७ वा क्रमांक पटकाविला असून टॉप १०० मध्ये यंदा स्थान मिळविले आहे. नगर परिषदेची मेहनत व शहरवासीयांचे सहकार्याचे हे फलीत आहे.

स्वच्छता सर्वेक्षणात गोंदिया पास
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्र्धेत गोंदिया शहर पास झाले आहे. गोंदियाने या स्पर्धेत देशातून ७६ तर राज्यात १७ वा क्रमांक पटकाविला असून टॉप १०० मध्ये यंदा स्थान मिळविले आहे. नगर परिषदेची मेहनत व शहरवासीयांचे सहकार्याचे हे फलीत आहे.
स्वच्छतेच मूलमंत्र घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या घराप्रमाणेच आपला देशही स्वच्छ असावा ही संकल्पना मांडून स्वच्छ भारत मिशन ही मोहीम छेडली आहे. यातच देशातील शहरांना स्वच्छतेच्या या मोहिमेत प्रोत्साहीत करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा सुरू केली आहे. यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ४८५ शहरांनी यात सहभाग घेतला. यात गोंदिया शहराने देशातून ७६ तर राज्यातून १६ वा क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे, स्वच्छता सर्वेक्षणाच्या परीक्षेत पास झालेल्या गोंदिया शहराने यंदा टॉप १०० मध्ये स्थान मिळविले आहे. स्वच्छता सर्वेक्षण २०१७ मध्ये ३४३ व्या क्रमांकावर असलेल्या गोंदिया शहराच्या या निकालाने शहरात नक्कीच काहीतरी बदल झाल्याचे स्पष्ट होते.
यासाठी नगर परिषदेनेही चांगलीच मेहनत घेतली असून या सर्व गोष्टींच्या आणि सर्वांच्या प्रयत्नांचे फलीतही यंदाच्या निकालातून नगर परिषदेला मिळाले आहे.
टीमवर्कची कमाल
स्वच्छता सर्वेक्षणाला घेऊन नगर परिषदेच्या सफाई विभागासह अवघ्या नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांची दिवसरात्र एक केल्याचे बघावयास मिळाले. शहराला यंदा चांगला क्रमांक मिळवून देण्यासाठी मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या नेतृत्वात प्रत्येकानेच धडपड केली. शिवाय शहरवासीयांचे सहकार्यामुळे आणि टीम वर्कची ही कमाल असल्याचे बोलले जात आहे.
या बाबी ठरल्या फायद्याच्या
स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत शहरातील स्वच्छता व त्यासाठी शहरवासीयांनी केलेले सहकार्य ही बाब जमेची ठरली. मात्र त्याशिवाय, ओला कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी गांडूळ खत निर्मिती, सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती व स्वच्छता, बाजार व रहिवासी परिसरात रात्रीची स्वच्छता तसेच कचरा वर्गीकृत करून गोला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ओला व सुका कचºयाच्या कुंड्या या बाबी सर्वेक्षणात गुण मिळवून देण्यासाठी फायदेशिर ठरल्या.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाने केला घात
नगर परिषदेकडे आतापर्यंत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. त्यामुळे नगर परिषदेला कचºयाची विल्हेवाट लावताना मोठी कसरत करावी लागते. परिणामी शहरातील केरकचºयाची नियमित विल्हेवाट लावली जात नाही. नेमकी हीच बाब नगर परिषदेला स्वच्छता सर्वेक्षणात भोवली. नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने येथेच समितीने गुण देताना काटकसर केल्याचे बोलल्या जाते.
नगर परिषदेला मिळालेले गुण
प्रत्यक्ष पाहणी
१२०० पैकी १११६
नागरिकांचा अभिप्राय
१४०० पैकी ११७७
प्रत्यक्ष कामगिरी
१४०० पैकी ५१४