मोडीलिपी प्रशिक्षण शिबिराचा समारोप
By Admin | Updated: August 29, 2016 00:13 IST2016-08-29T00:13:24+5:302016-08-29T00:13:24+5:30
महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालय व मनोहरभाई पटेल कला-वाणिज्य महाविद्यालय सालेकसाच्या इतिहास विभागाद्वारे आयोजित

मोडीलिपी प्रशिक्षण शिबिराचा समारोप
साखरीटोला : महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालय व मनोहरभाई पटेल कला-वाणिज्य महाविद्यालय सालेकसाच्या इतिहास विभागाद्वारे आयोजित १० दिवसीय मोडीलिपी प्रशिक्षणाचा समारोप डॉ. उमावती पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी प्रशिक्षक विनायक पाटील, संजय गुजले, समन्वय डॉ. नामदेव हटवार उपस्थित होते.
समारोपीय कार्यक्रमात १० दिवशीय अनुभव सुनील शेंडे, दीपक बिसेन, इंद्रकांता बोपचे, धर्मराज डोंगरे, मनिषा मुनेश्वर, अमित ढोमणे, रजत कावळे, पद्मा वाघमारे, निकेश गावड, बाबूसिंग राठोड यांनी कथन केले व प्रशिक्षणाचे महत्व विषद केले.
प्रास्ताविकात डॉ. हटवार यांनी मोडीलिपी प्रशिक्षणाची रोजगारासाठी आवश्यकता असून त्याचे महत्व, फायदे याबद्दल माहिती दिली. प्राचार्य ललीत जिवाणी यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षक पाटील व गुजले यांनी १० दिवशीय प्रशिक्षणात आलेले अनुभव सांगितले. तसेच आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात पहिल्यांदाच काम केल्याने आनंद झाल्याचे सांगितले.
संचालन अश्विन खांडेकर यांनी केले. आभार भुवन फुंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी योगराज थेर, रामकिशन शेंडे, संगीता हत्तीमारे, सुनंदा गडकरी, श्रीकांत भोवते, मोहन बन्सोडे, महेश परसगाये, भगवान साखरे, मनिषा मुनेश्वर, रजत कावळे, प्रतिभा फुंडे, उमेश वलथरे, गायत्री वडगाये, मुनेश्वरी राऊत यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)