नगर परिषद कर्मचारी करणार काळ्या फिती लावून निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:06+5:302021-04-01T04:30:06+5:30

गोंदिया : नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोंदिया नगर परिषद कर्मचारी संघर्ष समितीने तीन टप्प्यात आंदोलन ...

City council employees will protest with black ribbons | नगर परिषद कर्मचारी करणार काळ्या फिती लावून निदर्शने

नगर परिषद कर्मचारी करणार काळ्या फिती लावून निदर्शने

गोंदिया : नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोंदिया नगर परिषद कर्मचारी संघर्ष समितीने तीन टप्प्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनच्या पहिल्या टप्प्यात नगर परिषद कर्मचारी १ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहेत. १५ एप्रिल रोजी लेखणी बंद आणि १ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला.

नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे संघटनेच्या माध्यमातून अनेकदा पाठपुरावा करण्यात आला; पण त्याची अद्यापही शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. या आंदोलनात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे सुरेंद्र बन्सोड, नरेंद्र तिवारी, दिलीप चाचिरे, राजेश शर्मा यांनी कळविले आहे.

Web Title: City council employees will protest with black ribbons