नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:01 IST2021-09-02T05:01:41+5:302021-09-02T05:01:41+5:30

गोंदिया : ठाणे (मुंबई) येथील सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकूने हल्ला करून त्यांची दोन बोटे तोडल्याच्या घटनेच्या ...

City council employees strike () | नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन ()

नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन ()

गोंदिया : ठाणे (मुंबई) येथील सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकूने हल्ला करून त्यांची दोन बोटे तोडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ येथील नगर परिषद कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. ३१) काम बंद आंदोलन केले. या घटनेचा निषेध नोंदवत व हल्लेखोरावर कारवाईची मागणी करीत कर्मचारी युनियनच्या वतीने मुख्याधिकारी करण चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

ठाणे येथील सहायक आयुक्त पिंपळे या कासारवडवली येथील मुख्य बाजारात रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी (दि. ३०) सायंकाळी आपल्या पथकासह गेल्या होत्या. यादरम्यान कारवाई करीत असताना एका फेरीवाल्याने त्यांच्यावर रागाच्या भरात चाकूने हल्ला केला असता त्यांच्या हाताची दोन बोटे तुटून पडली. विशेष म्हणजे, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नागरिकांकडून हल्ला करण्याच्या कित्येक घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. अशात या घटनेचा निषेध नोंदवत येथील नगर परिषद कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. ३१) काम बंद आंदोलन करून हल्लेखोरावर कारवाई करण्याची मागणी असलेले निवेदन मुख्याधिकारी चव्हाण यांना दिले.

-------------------------------

मुख्याधिकारी संघटना आज देणार निवेदन

ठाणे येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्वच नगर परिषद व नगर पंचायतींमध्ये कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तसेच कर्मचारी युनियनने मुख्याधिकारी व पोलिसांत निवेदन दिले. दरम्यान, या आंदोलनांतर्गत मुख्याधिकारी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील २ नगर परिषद व ६ नगर पंचायतचे मुख्याधिकारी बुधवारी (दि.१) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.

Web Title: City council employees strike ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.