नागरिकांनी एलईडी लाईटचा वापर करावा

By Admin | Updated: September 11, 2016 00:29 IST2016-09-11T00:29:00+5:302016-09-11T00:29:00+5:30

आपणास औष्णिक उर्जा ही महाग पडत असून आवश्यकतेऐवढी आपण निर्माण करु शकत नाही.

Citizens should use LED lights | नागरिकांनी एलईडी लाईटचा वापर करावा

नागरिकांनी एलईडी लाईटचा वापर करावा

विजय रहांगडाले : विर्सी चौकात हायमास्ट लाईटचे उद्घाटन
तिरोडा : आपणास औष्णिक उर्जा ही महाग पडत असून आवश्यकतेऐवढी आपण निर्माण करु शकत नाही. त्यामुळे प्रदूषणही भरपूर होतो. वीज वापरताना महाग पडत असून सौर ऊर्जेचा वापर केल्यास त्यातही एलईडीचा वापर केल्यास प्रकाश भरपूर मिळेल व बिलही भरावे लागणार नाही. नागरिकांनाही एलईडी लाईटच्या वापर करावा, असे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले.
विरसी चौकातील हायमास्ट लाईटचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
उद्घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते, सरपंच पद्मा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने पोलीस पाटील हेमंत नागपुरे, प्रमोद गौतम, प्रफुल टेंभरे, गोपीचंद बावणकर, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाने, गजानन फटिंग, बकाराम पटले उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, हे हायमास्ट लाईट आपल्या आमदार निधीतून लावले असून तिरोडा तालुक्यात आठ ठिकाणी लावण्यात आले आहेत. असा हा नाविण्यपूर्ण उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याच विधानसभा क्षेत्रात होत असल्याचे सांगितले. शाळेच्या आवार भिंतीसाठी पाच लाखांचा निधी मंजूर झाल्याचेही सांगितले.
शेतीसाठी पाणी महत्वाचे आहे. खळबंदा तलावात लवकरच पाणी सोडले जाईल तर चोरखमारा व बोदलकसा जलाशयात पाणी सोडण्याचे कार्य टप्पा-२ मध्ये होणार आहे. प्रकाशाच्या बाबतीत प्रथमत: गोला लाईट, ट्यूब लाईट, सीएफएल बल्व आणि आता एलईडी बल्ब आलेत.
एलईडीमुळे विद्युत बचत होते. त्यामुळे नागरिकांनी एलईडीचा वापर करावा. शासनाचे पाऊलसुद्धा याकडे आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक हंसराज रहांगडाले यांनी मांडले. संचालन नरेश रहांगडाले यांनी केले. आभार घनश्याम पटले यांनी मानले. कार्यक्रमासाठी दत्तू राघोर्ते, घनशाम हेडाऊ, इंदल पटले, डोंगरू पटले, गजानन बिसेन, माणिकदास हेडाऊ, सुदाम नान्हे, चैतराम ठाकरे, युगलकिशोर रहांगडाले, सुदाम बागडे, अनिल रहांगडाले, मुन्ना पटले, अर्जुन पटले यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Citizens should use LED lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.