नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:29 IST2021-04-08T04:29:12+5:302021-04-08T04:29:12+5:30
बिरसीफाटा : कोरोनाची दुसरी लाट आली असून त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे ...

नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे
बिरसीफाटा : कोरोनाची दुसरी लाट आली असून त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करून स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी. घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, असे सरपंच गौरीशंकर टेंभरे यांनी कळविले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे. ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असल्यास त्यांनी त्वरित कोरोना तपासणी करावी. पॉझिटिव्ह रुग्णांनी स्वतः व कुटुंबातील सदस्यांनी समाजातील लोकांशी संपर्क टाळावा. स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. नियमित कोमट पाणी प्यावे. पाण्याची वाफ घ्यावी. सॅनिटायझरचा वापर करावा. ३० एप्रिलपर्यंत आठवडीबाजार बंद करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर बंदी करण्यात आली आहे. रात्रीच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व निर्देशांचे पालन करावे.