नागरिकांनी बिनधास्तपणे लसीकरणासाठी पुढे यावे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST2021-05-18T04:29:56+5:302021-05-18T04:29:56+5:30

देवरी : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस रूग्णसंख्येत वाढ होत आहे. या संसर्गापासून आपणास वाचविण्याकरिता शासनाद्वारे सर्व नागरिकांकरिता कोरोना ...

Citizens should come forward for immunization without any hesitation () | नागरिकांनी बिनधास्तपणे लसीकरणासाठी पुढे यावे ()

नागरिकांनी बिनधास्तपणे लसीकरणासाठी पुढे यावे ()

देवरी : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस रूग्णसंख्येत वाढ होत आहे. या संसर्गापासून आपणास वाचविण्याकरिता शासनाद्वारे सर्व नागरिकांकरिता कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात मोठ्या संख्येने नागरिक या लसीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा. तसेच लसीकरणासाठी नागरिकांनी बिनधास्तपणे पुढे यावे असे प्रतिपादन आ. सहषराम कोरोटे यांनी केले.

तालुक्यातील पिपरखारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाच गावातील लोकांशी बुधवारी बैठक घेऊन कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी आमदार कोरोटे यांच्यासह पिपरखारीचे माजी सरपंच सुदाम भोयर, उपसरपंच मुनेश्वर भोगारे, काशीराम भलावी, अशोक मडावी, उमेश मडावी, वासुदेव पुराम यांच्यासोबत पिपरखारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या महाजनटोला, बिचटोला, स्कुलटोला, पुरामटोला व गौराटोला येथील नागरिक उपस्थित होते. या भेटी दरम्यान आ. कोरोटे यांनी येथील गावातील विविध समस्या प्रामुख्याने पिण्याचे पाणी, रोड व नाली, घरगुती गॅस, विद्युत दाब आणि स्वस्त धान्य या विषयावर नागरिकांशी संवाद साधून सविस्तर चर्चा केली. तुमच्या सर्व समस्या त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी देवरीचे अन्न पुरवठा निरीक्षक सतीश अगडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून स्वस्त धान्य विषयी तर घरगुती गॅस विषयी चिचगडचे घरगुती गॅसचे वितरक अर्चना नरवरे यांच्याशी चर्चा केली. पिपरखारीचे ग्रामसेवक धुर्वे यांना सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करण्यास सांगितले.

.....

बिचटोला येथील विजेची समस्या मार्गी लावणार

बिचटोला येथे विद्युत दाब कमी असल्याने या क्षेत्राचे विद्युत दाब चार दिवसाच्या आत पूर्ववत करण्याचे वीज वितरक कंपनी चिचगडचे कनिष्ठ अभियंता यांना निर्देश दिले. यावेळी अन्य विषयावरपण चर्चा करण्यात आली.

Web Title: Citizens should come forward for immunization without any hesitation ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.