कोरोना चाचणीसाठी नागरिकांनी पुढे यावे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST2021-04-21T04:29:41+5:302021-04-21T04:29:41+5:30

बोंडगावदेवी : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात ठिकठिकाणी कोरोना चाचणी करण्यात येत आहे. ...

Citizens should come forward for corona test () | कोरोना चाचणीसाठी नागरिकांनी पुढे यावे ()

कोरोना चाचणीसाठी नागरिकांनी पुढे यावे ()

बोंडगावदेवी : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात ठिकठिकाणी कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कोरोनाविषयीची माहिती देऊन गावातील समस्त जनतेला मार्गदर्शन करण्यात येत आहे. जवळील निमगाव तसेच इंजोरी येथे कोरोना चाचणी अभियान राबविण्यात आले.

सध्या सर्वत्र कोरोनाचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होत आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या तीव्र गतीने वाढत आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. शासकीय रुग्णालयात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने सामान्य जनतेसमोर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. उपलब्ध असलेल्या साधन-सुविधांसह आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी परिसरातील कार्यक्षेत्रात कोरोना चाचणी अभियान तसेच मिशन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोठ्या प्रमाणात राबवित आहेत. निमगाव व इंजोरी येथे कोरोना चाचणी करतेवेळी गावकऱ्यांशी हितगुज साधताना डॉ. श्वेता कुळकर्णी म्हणाल्या की, कोरोनाविषयी मनात भीती बाळगू नका. काही लक्षणे आढळून येताच घरामध्ये न राहता मोठ्या मनाने कोरोना चाचणी करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकाने सावधगिरी बाळगल्यास कोरोना महामारीवर मात करता येणे सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. निमगाव व इंजोरी येथे गावासह परिसरातील जनतेने कोरोना चाचणी करून घेतली. त्यात निमगाव येथील दोन, बोंडगावदेवीचे दोन, इंजोरी येथील तीन, बाक्टी, खांबी, भिवखिडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यांना स्वत:च्या घरातील स्वतंत्र खोलीत विलगीकरणात राहण्याचा सल्ला देऊन औषधी वाटप करण्यात आली. डॉ. श्वेता कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका सोनवाने, आरोग्य सेवक सातारे, दोनोडे, आशा पर्यवेक्षिका राखडे, घनश्याम उरकुडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Citizens should come forward for corona test ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.