पटांगण वाचविण्यासाठी नागरिकांचा मोर्चा

By Admin | Updated: September 2, 2015 01:59 IST2015-09-02T01:59:23+5:302015-09-02T01:59:23+5:30

शहराच्या मध्यभागी असलेल्या जि.प. प्राथमिक शाळेच्या पटांगणावर महसूल विभागातर्फे शासकीय गोडाऊनसाठी

Citizens' Front to save the premises | पटांगण वाचविण्यासाठी नागरिकांचा मोर्चा

पटांगण वाचविण्यासाठी नागरिकांचा मोर्चा

देवरी : शहराच्या मध्यभागी असलेल्या जि.प. प्राथमिक शाळेच्या पटांगणावर महसूल विभागातर्फे शासकीय गोडाऊनसाठी बांधण्यात येत असलेल्या सुरक्षा भिंतीच्या विरोधात मैदान बचाव कृती समितीने मोर्चा काढून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. मंगळवारी दि. १ स्टेंबर रोजी प्राथमिक शाळेच्या मैदानावरुन शहराच्या प्रमुख मार्गाने मोर्चा काढण्यात आला.
तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करुन तहसीलदार संजय नागटिळक यांना निवेदन दिवून बांधकाम बंद करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात केलेल्या मागणीनुसार, शाळेच्या पटांगणाजवळ असलेल्या गोडावून जवळील अर्धे मैदानात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे अर्धे मैदान संपुष्टात येणार असून त्यामुळे शासकीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, तहसील कमेटीचे कार्यक्रम, सांस्कृतीक कार्यक्रम तसेच गणपती, शारदोत्साव, शालेय स्पर्धा, क्रिकेट टुर्नांमेट, लग्न समारंभ, राजकिय सभा करीता अडथळा निर्माण होईल करीता सुरक्षा भिंतीचे काम त्वरीत बंद करण्यात यावे. तसेच तसेच नॅशनल हायवेच्या दोन्ही बाजुला लेंथ देवून ग्रामीण रुग्णालयाचा मुख्य मार्ग मोकळा करण्यात यावा. या दोन्ही प्रमुख मागण्याकरीता आज शाळकरी मुले व गावकऱ्यांनी लाक्षणिक आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व प्रवीण दहीकर, जुबीन खान, माजीद खान, विनोद अग्रवाल, असलम खान, पोकेश मुलतानी, मुकेश खंडेलवार, रवी काळे, दिवाकर शेंद्रे, जाकीरभाई, राहुल मोहबीया यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते. माजी महिला बालकल्याण सभापती सवीता पुराम यांनी उपोषण स्थळाला भेट देवून देवरीवासीयांच्या मागणी संबंधात तहसीलदारांशी चर्चा करुन त्वरीत बांधकाम बंद करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Citizens' Front to save the premises