नागरिकांनो सावधान ! तरूणांमुळेच मुले, ज्येष्ठांमध्ये वाढतोय कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 05:00 IST2021-04-13T05:00:00+5:302021-04-13T05:00:23+5:30

भाजी, औषधी किंवा किराणा वैगरे घेण्याचे सोडून इतरही कामाने किंवा मित्र मंडळींच्या भेटीगाठीसाठी  तरूण मंडळी सहजरीत्या घराबाहेर पडत आहेत. कोरोनापेक्षा त्यांना पाेलिसांची भीती वाटत असली तरी विविध कारणे पुढे करून ते घराबाहेर पडतात. बाहेरून घरात कोरोना आणल्यावर ते घरातील लोकांच्या संपर्कात येऊन म्हाताऱ्या व बालकांना हसत-खेळत कोराेनाची भेट देत आहेत. यामुळेच २४ तास घरातच राहणारे म्हातारे व लहान बालकेही कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत.

Citizens beware! Corona is growing among children and seniors due to youth | नागरिकांनो सावधान ! तरूणांमुळेच मुले, ज्येष्ठांमध्ये वाढतोय कोरोना

नागरिकांनो सावधान ! तरूणांमुळेच मुले, ज्येष्ठांमध्ये वाढतोय कोरोना

ठळक मुद्देतरूण बेसावध : आपल्या घरच्यांसाठी तरी बाहेर फिरू नका

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासाठी तरूण मंडळी सर्वाधिक कारणीभूत आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक घरातच राहत असले तरी त्यांच्याच घरातील तरूण मंडळी घरातून विविध कारणांनी बाहेर जाऊन कोरोना घेऊन घरी परत येत आहेत. त्यामुळे घरातील मंडळी कोरोना पाशात अडकत असल्याचे दिसत आहे.  
भाजी, औषधी किंवा किराणा वैगरे घेण्याचे सोडून इतरही कामाने किंवा मित्र मंडळींच्या भेटीगाठीसाठी  तरूण मंडळी सहजरीत्या घराबाहेर पडत आहेत. कोरोनापेक्षा त्यांना पाेलिसांची भीती वाटत असली तरी विविध कारणे पुढे करून ते घराबाहेर पडतात. बाहेरून घरात कोरोना आणल्यावर ते घरातील लोकांच्या संपर्कात येऊन म्हाताऱ्या व बालकांना हसत-खेळत कोराेनाची भेट देत आहेत. यामुळेच २४ तास घरातच राहणारे म्हातारे व लहान बालकेही कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग करण्यासाठी त्यांच्याच घरातील तरूण मंडळी कारणीभूत ठरले आहे. ज्या तरूणांनी घरात कोरोना आणला ते सुखरूप आहेत. परंतु घरातील म्हाताऱ्यांना त्यांनी जीवन-मरणाच्या दारात नेऊन सोडले आहे. तरूणांच्या बेजबाबदारपणाला घरातीलच मंडळींनी लगाम लावण्याची गरज आहे व तेव्हाच कोरोनाला आळा बसेल.
बाहेरून घरी आल्यास ही घ्या काळजी
n आपण कामानिमित्त किंवा बाजारातून घरी परतल्यास घरात प्रवेश करण्याच्या अगोदर साबणाने आंघोळ घालूनच घरात प्रवेश करावा. जेणेकरून बाहेरून कोरोना विषाणू घरी घेऊन गेले तरी ते घरात प्रवेश करणार नाहीत.
n आंघोळ करण्यासाठी काढलेल्या कपड्यांना व आंघोळीनंतरच्या कपड्यांना एका बादलीत कपडे धुण्याचे पावडर असलेल्या पाण्यात भिजवायचे . भाजीपाला आणल्यास त्यालाही पाण्यातून धुवून काढायचे.
 बाहेरून घरी गेल्यास गरम पाणी प्यावे, हळदीचा चहा घ्यावा, गरम अन्न खावे, आईस्क्रीम किंवा थंड पदार्थांचे सेवन टाळावे.

ही पहा उदारहण...
कोरोनाच्या भीतीमुळे माझे आई-बाबा मला शेजारच्या घरीही खेळायला जाऊ देत नाही. तरी देखील मला कोरोना झाला. माझा मोठा भाऊ घरातून बाहेर जातोे त्याला काहीच झाले नाही आणि मला कोरोना झाला, आम्ही घरी असतो तरी देखील कोरोना झाला आहे, असे एका उपचार घेणाऱ्या मुलाने म्हटले आहे.  

 मी आपले काम केल्यानंतर घरातच आराम करतो. घरातील मंडळीशिवाय माझा दुसऱ्या कुणाशीही संपर्क आला नाही. घरातील मंडळी खूप कमी प्रमाणात घराबाहेर जातात. तरीही मी कोविड पॉझिटिव्ह आलो. गृहकामासाठी, काही साहित्य आणण्यासाठी घरातील मंडळी बाहेर जाणार नाही तर काय. परंतु खूप काळजी घेऊनही आम्ही पाॅझिटिव्ह आलो आहोत. आताही काळजी घेणे सुरूच असल्याचे एका वृद्धाने सांगितले.

अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये.  नियमितपणे तोंडाला मास्क लावावा. शारीरिक अंतर ठेवूनच इतर आवश्यक कामे करावीत. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. विना कामाने घराबाहेर पडणारे स्वत:चा व आपल्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालत आहेत. यासाठी प्रत्येकाने विचार करावा.
डॉ. अमरीश मोहबे, 
जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया.

 

Web Title: Citizens beware! Corona is growing among children and seniors due to youth