नरेश रहिलेगोंदिया: जून्या वादाचा वचपा काढण्यासाठी तलवार घेऊन चार तरूण प्रौढाच्या मागे धावत होते. तर तो प्रौढ आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत होता. सिनेस्टाईलने पाठलाग करीत त्याला धारदार तलवारीने मारून त्याचा खून केला. ही घटना १२ मे रोजी सकाळी ९:३० ते १० वाजता दरम्यान गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कारंजाच्या संस्कार चौकात घडली. या खुनात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव महेंद्र उर्फ मिलींद्र मदारकर (४९) रा. कारंजा असे आहे.
सोमवारी सकाळी ९:३० वाजता महेंद्र मदारकर हे विशाल उईके यांच्या घरी भेटण्याकरीता जात असतांना आरोपींनी त्यांना पाहून तलवार घेऊन त्यांच्या दिशेने धाव घेतली. आपला जीव वाचविण्यासाठी मेहंद्र पळत असतांना आरोपींनी पाठलाग करू लागले. आपला जीव वाचविण्यासाठी पळत असलेले महेंद्र मदारकर हे पळतांना विशाल उईके यांच्या घरामागील तिलक बावनथडे यांच्या घराच्या बांधकामाच्या कॉलमच्या खड्यात पडले. त्या ठिकाणी चारही आरोपी धावत जाऊन त्यांनी महेंद्रच्या डोक्यावर, गळ्यावर, हनुवटीवर, डाव्या गालावर, डाव्या हाताच्या पंज्यावर, पायावर तलवारीने मारुन जागीच ठार केले. या घटनेसंदर्भात रामप्रसाद लालचंद मदारकर (३१) यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३ (५) सहकलम ४,२५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरिक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रितमकुमार येरमे करीत आहेत.
या आरोपींनी केला खूनमृतक महेंद्र उर्फ मिलींद्र मदारकर (४९) यांचा खृन करणाऱ्या आरोपीत राजगब्बर इंदल रंगारी (३५) रा. भद्रुटोला, गुलशन प्रकाश उके (३०), अजय लच्छुराम कल्लो (३३) रा. हिमगीरी कॉलनी कारंजा व कृष्णा उर्फ आलु सत्यभान मेश्राम (२२) रा. कारंजा यांचा समावेश आहे. त्या चौघांना गोंदिया ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
मृतकावरही होता खुनाचा गुन्हाया प्रकरणातील मृतक महेंद्र उर्फ मिलींद्र मदारकर (४९) याच्यावर सन १९९९ मध्ये गोंदिया ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे. परंतु त्या घटनेसोबत या घटनेचा काहीच संबध नसल्याच ठाणेदार चंद्रकांत काळे म्हणाले.
गुलशनला केली होती मारहाणमृतकने काही दिवसापूर्वी आरोपींपैकी एकाला मारहाण केली होती. या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी त्याला सळो की पळो करीत तलवार घेऊन त्याला मारायला धावले. तो पळत असतांनाही त्यांनी पाठलाग करून चक्क भरदिवसा तलवारीने मारून खून केला.