सरपंच-उपसरपंचांची निवड शांततेत
By Admin | Updated: August 6, 2015 00:50 IST2015-08-06T00:50:27+5:302015-08-06T00:50:27+5:30
जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या होत्या. आता अनेक ठिकाणी सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक होत आहे.

सरपंच-उपसरपंचांची निवड शांततेत
गोंदिया : जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या होत्या. आता अनेक ठिकाणी सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक होत आहे. ज्या ग्रामपंचायतमध्ये सदर पदांची निवडणूक प्रक्रिया पार पडली त्याबाबतचे वृत्त.
खमारीच्या सरपंचपदी विमला तावाडे
गोंदिया तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावाजलेल्या खमारी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी विमला मोहन तावाडे यांची निवड करण्यात आली. खमारी येथे काँग्रेस समर्थित पॅनलने ग्रामपंचायतवर आपला झेंडा रोवला.
खमारी ग्रामपंचायतच्या १७ जागांसाठी ६० उमेद्वार रिंगणात होते. त्यात १७ पैकी ११ जागांवर काँग्रेस समर्थित पॅनलचे सदस्य निवडून आले. तर चार सदस्य भाजपचे, एक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस व एक अपक्ष उमेदवार निवडून आला. काँग्रेसच्या ११ पैकी एका उमेदवार महिलेने पक्षाच्या जेष्ठांची न ऐकता स्वत: सरपंच पदासाठी अर्ज केले. मात्र या निवडणुकीत विमला मोहन तावाडे यांची सरपंच पदासाठी निवड करण्यात आली. उपसरपंच म्हणून कैशास भजनदास साखरे तर सदस्य मनोहर बुधा नागरिकर, महेंद्र ताराचंद बनकर, महेंद्र दुलीचंद मेंढे, निलकंठ सिताराम मेश्राम, निलराज उका कांबळे, राजू अमरपाल बघेले, सचिन अशोक मेश्राम, आशा ओमप्रकाश तावाडे, निर्मला हेमराजगिरी गोस्वामी उपस्थित होते.
या वेळी सरपंच व उपसरपंच यांचा पुष्पगुच्छ देऊन जि.प. सदस्य विठोबा लिल्हारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राध्येश्याम तावाडे, हेमराज डिब्बे, दुलीचंद मेढे, चुन्नीलाल किरणापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या ग्रामपंचायतवर यापूर्वी यांच्याच घराण्यातील मोठी जाऊ भाजप पक्षातून सरपंच होत्या. परंतु आ. गोपालदास अग्रवाल याच्या मार्गदर्शनात झालेल्या निवडणुकीत लहान जाऊला सरपंच बनविण्यात आले.
सावरी ग्रा.पं.वर राष्ट्रवादीचा झेंडा
सावरी येथे मंगळवार (दि.४) सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापित केली. यात सरपंच डिलेश्वरी जिवेंद्र पटले तर उपसरपंच पदावर नरेंद्रसिंह संपतराव चिखलोंढे यांची निवड झाली.
नवनिर्वाचित सदस्यांमध्ये देवकन चुन्नीलाल बिसेन, सितारा शिशुपाल दमाहे, आशा महेश कुंभरे, अनिता आत्माराम पटले व निरंजना गौतम डोंगरे यांचा समावेश आहे. नवीन सरपंच व उपसरपंच यांचे पक्ष कार्यालयात देवेंद्रनाथ चौबे, तालुका अध्यक्ष कुंदन कटारे, प्रवक्ता अशोक शहारे, माजी जि.प. सदस्य नरेंद्र तुरकर, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सुनील पटले यांनी स्वागत केले.
सरपंच-उपसरपंच निवडणुकी दरम्यान गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. निवडणुकीसाठी जिवेंद्र पटले, चुन्नीलाल बिसेन, पंकज चिखलोंढे, डॉ. टेकचंद चिखलोंढे, लक्ष्मीचंद चिखलोंढे, रूपलाल चिखलोंढे, आत्माराम पटले, महेश कुंभरे, मनोज लिल्हारे, मितेश चिखलोंढे, गुलाब बिसेन, जानकी बिसेन, भिवलाल बोपचे, बंशी दमाहे, मनोज चिखलोंढे, राजकुमार लिल्हारे, कमलेश बागडे, रामेश्वर हिरापुरे, रविकिशन बसेना, जगदीश तिवडे, रवी कुत्राहे, रोशन बिसेन यांनी सहकार्य केले.
सरपंचपदी सोनेवाने तर उपसरपंचपदी चांदेवार
इसापूर : येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आनंदराव सोनवाने तर उपसरपंचपदी गजानन चांदेवार यांची अविरोध निवड करण्यात आली. तसेच सदस्यांमध्ये निराशा खुने, सरस्वता वलथरे, सुनिता गेडाम, दामोदर चांदेवार, रिगेश्वरी चांदेवार यांचा समावेश आहे.
सरपंच पदासाठी आनंदराव सोनवाने व सुनिता गेडाम यांची अर्ज केले होते. सुनिता गेडाम यांनी उमेदवारी मागे घेतल्याने आनंदराव सोनवाने यांना अविरोध सरपंच घोषित करण्यात आले. तर उपसरपंच पदासाठी गजानन चांदेवार यांचा एकच अर्ज आल्याने त्यांनाही अविरोध उपसरपंच घोषित करण्यात आले.
इसापूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले गजानन चांदेवार हे कोणत्या गटाला जावून मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आनंदराव सोनवाने यांच्या गटाचे तीन सदस्य तर चांदेवार गटाचे चारपैकी तीन सदस्य निवडून आले होते. गजानन चांदेवार अपक्ष निवडणूक लढवूनही भरघोष मतांनी निवडून आले होते. मागील १० वर्षांपासून ग्रामपंचायतवर चांदेवार गटाचे वर्चस्व होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा एक उमेदवार पडल्याने व अपक्ष गजानन चांदेवार आनंदराव सोनवाने यांना मिळाल्याने चांदेवार गटाचे वर्चस्व संपले.
सरपंचपदी टेंभेकर तर उपसरपंचपदी कटरे
काचेवानी : बेरडीपार येथे ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच पदांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. नऊ सदस्यांच्या या ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी ज्योत्स्रा कमलेश टेंभेकर तर उपसरपंचपदी नागेश्वर श्यामलाल कटरे यांची निवड करण्यात आली.