पर्यायाअभावी चायना सिरीजलाच पसंती
By Admin | Updated: October 22, 2016 00:33 IST2016-10-22T00:33:37+5:302016-10-22T00:33:37+5:30
भारतात सिरीज (लाईटींग) बनविण्याचे काम बंद असल्याने पर्याया अभावी नागरिकांना चायना सिरीजचीच खरेदी करावी लागत आहे.

पर्यायाअभावी चायना सिरीजलाच पसंती
दिवाळीनिमित्त खरेदी सुरूच : भारतीय सिरीज बनविण्याची गरज
कपिल केकत गोंदिया
भारतात सिरीज (लाईटींग) बनविण्याचे काम बंद असल्याने पर्याया अभावी नागरिकांना चायना सिरीजचीच खरेदी करावी लागत आहे. चायना आयट्म्सला कितीही विरोध असला तरी सिरीजच्या बाबतीत मात्र नागरिकांना मनमारावे लागत आहे. त्यामुळे भारतात सिरीज तयार करण्याची मागणीही होत आहे. तोवर दिवाळीत घरांवर चायना सिरीजच चकाकणार हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.
प्रकाशाच्या सणात प्रत्येकांनाच आपले प्रकाशमान करावयाचे आहे. यासाठी उत्तम माध्यम हे सिरीज (लाईटींग) आहे. रंगबिरंगी सिरीज घरावर लावल्यानंतर रात्रीला त्यांचा उजेड आकर्षूण घेतो. बाजारात वेगवेगळ््या प्रकारच्या सिरीज यासाठी उपलब्ध आहेत. मात्र या सर्व सिरीज चायना मेड असून भारतात सिरीजचे उत्पादन होत नसल्याची आजची परिस्थिती आहे. परिणामी सर्वांना आपल्या घरांच्या सजावटीसाठी चायना सिरीजचीच खरेदी करावी लागत आहे.
एकीकडे चायना मेड आयट्मवर बहिष्कार टाकला जात आहे. कित्येकांनी त्याचधर्तीवर चायना आयट्म्स खरेदी न करण्याचा संकल्पही घेतला असून त्यांनी चायना सिरीजची खरेदी केली नसावी. मात्र दिवाळी या सणात आपल्या घराच्या सजावटीसाठी बहुतांश नागरिक सिरीज खरेदी करतच असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे चायना सिरीजला पर्याय नसल्याने मागणी आहेच. शिवाय विक्रेते सुद्धा मर्जी नसतानाही फक्त व्यापार म्हणून चायना सिरीजची विक्री करीत आहेत.
राष्ट्रीय पातळीवर बंदी हवी
देशवासीयांकडून चायना आयटम्स खरेदी करण्यावर बहिष्कार टाकला जात आहे. मात्र सणामुळे व चायना सिरीजला पर्याय नसल्यामुळे कित्येकांकडून मनमारून चायना सिरीज खरेदी केली जात आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच नियोजन करून देशात चायना आयटम्सलाच बंदी घालण्याची गरज असल्याचेही काहींनी बोलून दाखविले. देशात चायना आयटम्स येणार नाहीत, अशात देशातच सिरीज तयार करण्याचे कारखाने सुरू होतील व देशावासी आपल्या देशातीलच सिरीज खरेदी करू लागतील असे नागरिकांचे मत आहे.
३० रूपयांपासून सिरीज उपलब्ध
बाजारात सध्या ३० रूपयांपासून १५० रूपयांपर्यंत चायना सिरीज उपलब्ध आहेत. विविध रंग व प्रकारांची ही सिरीज असल्याने नागरिकांकडून दिवाळीच्या सजावटीनिमित्त या सिरीजची खरेदी केली जात आहे. त्यामुळे सध्या इलेक्ट्रनिक साहीत्यांच्या दुकानात नागरिकांची सिरीज खरेदीसाठी जास्त गर्दी दिसू लागली आहे. सिरीजचा हा व्यवसाय दिवाळीतच राहतो त्यामुळे व्यापारीही मोठ्या प्रमाणात सिरीज मागवून ठेवतात.