महिलांच्या हक्कासाठी आंदोलन छेडणार- चित्रा वाघ
By Admin | Updated: September 11, 2015 02:09 IST2015-09-11T02:09:39+5:302015-09-11T02:09:39+5:30
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील महिलांवरील अन्याय-अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश राज्यांना मागे घालत अत्याचारांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर चालत आहे.

महिलांच्या हक्कासाठी आंदोलन छेडणार- चित्रा वाघ
गोंदिया : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील महिलांवरील अन्याय-अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश राज्यांना मागे घालत अत्याचारांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर चालत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी व रक्षणासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी रस्त्यावर उतरून महिलांना न्याय देण्यासाठी संघर्ष करणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिला.
गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्ता बैठक नुकतीच पार पडली. त्यात ते महिला कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते.
बैठकीत आ. राजेंद्र जैन म्हणाले की, राज्यात सत्ताधारी भाजपा सरकार महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यात अपयशी ठरली आहे. ही परिस्थिती विद्यमान सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेली असून आम्ही सरकारच्या विरोधात संघर्षपूर्ण आंदोलन करणार, असे ते म्हणाले.
आपल्या मार्गदर्शनात वाघ पुढे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात महिलांच्या हक्कासाठी आमची आघाडी काम करीत आहे. १८ ते ३५ वर्षे वयोगटादरम्यानच्या महिला व युवती आमच्या पक्षापासून दूर असल्याचे लक्षात येताच खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस युवती संघटन तयार करण्यात आले. देशातील युवतीसाठी संघटन तयार करणारा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. महिला आघाडीने महिलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले असून आरोग्य सुविधांसोबतच युवती व महिलांना रोजगाराच्या संधी कशा मिळतील, याकडेही लक्ष असल्याने ते म्हणाले.
यावेळी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, नागपूरच्या जिल्हाध्यक्ष दिप्ती काळमेघ, नगरसेविका प्रगती पाटील, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, गोंदिया शहर महिला अध्यक्ष आशा पाटील, बँक संचालक प्रिया हरिणखेडे, तिरोडा पं.स. सभापती उषा किंदरले, जि.प. सदस्य वीणा बिसेन, खुशबू टेंभरे, ललिता चौरागडे, उपाध्यक्ष ममता बैस, अर्चना जायस्वाल, शाहीन मिर्जा, रजनी गौतम, सुनिता मडावी, प्रीती रामटेके, अनिता तुरकर, निता रहांगडाले, शालू पंधरे, शीला अंबुले, राखी ठाकरे, अनिता जैन, आशा पिल्लारे, कुंदा चंद्रिकापुरे, चेतना पटले, कुंदा भाष्कर, कुंदा दोनोडे, पुष्पा बोपचे, सरपंच वडगाये व इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन लता रहांगडाले यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)