अनेक वर्षांपासून सुरू आहे चिरीमिरीचा खेळ
By Admin | Updated: December 4, 2015 02:03 IST2015-12-04T02:03:53+5:302015-12-04T02:03:53+5:30
तालुका कृषी अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही. त्यांचे भंडारा येथून जाणे-येणे असल्यामुळे कृषी कार्यालयात अनेक दिवसांपासून सावळा-गोंधळ सुरु आहे.

अनेक वर्षांपासून सुरू आहे चिरीमिरीचा खेळ
कृषी कार्यालयातील कारभार : अधिकाऱ्याच्या घरातून साहित्यांचे वाटप
आमगाव : तालुका कृषी अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही. त्यांचे भंडारा येथून जाणे-येणे असल्यामुळे कृषी कार्यालयात अनेक दिवसांपासून सावळा-गोंधळ सुरु आहे. याचा फायदा कार्यालयातील एका अधिकाऱ्याने चांगलाच घेतला. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या चिरीमिरीच्या खेळात शासनाच्या शेती उपयोगी अनेक वस्तू या साहेबांच्या घरात जातात व तेथून त्यांची परस्पर विक्री होत आहे. मात्र तालुका कृषी अधिकाऱ्याचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने यामध्ये त्यांचा हात तर नाही अशी चर्चा सुरू आहे.
कृषी कार्यालयातील उके नावाचे अधिकारी रिसामा येथे भाड्याने राहतात. शासनाच्या शेती उपयोगी अनेक वस्तू कार्यालयात किंवा गोदामात न जाता त्यांच्या घरी कशाप्रकारे जातात. वरील स्तरावरून आलेल्या उपज साहित्याची कार्यालयात नोंद असणे गरजेचे आहे. किती साठा झाला व गरजू शेतकऱ्यांना किती वाटप झाला याची माहिती कृषी कार्यालयात असते. कार्यालयात अनेक कर्मचारी आहेत.
याची सर्वांना कल्पना असून याबाबद कोणी वरिष्ठाकडे तक्रार का केली नाही? किंवा माहिती असेल तर केवळ चिरीमिरीच्या नावावर शासन योजनेचा बट्याबोळ करण्याचा हा प्रकार आहे. तालुका कृषी अधिकारी धरमशहारे यांचे जाणे-येणे सुरु आहे. याबाबत त्यांना कल्पना कशी नाही? याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना मिळणारे साहित्य त्यात तुळदाळ, चना, औषधी व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात कृषी कार्यालयात येतात. तेथून सातबारा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना वाटप केला जातो.
मात्र तो प्रकार येथील कार्यालयात होत नाही. शेतकऱ्यांचे मार्गदर्शन मेळावे होत नाही. चर्चासत्र नाही, कृषी विभागाकडून तयार करण्यात आलेले अनेक बंधारे जिर्ण अवस्थेत पडले आहे. काही प्रकल्प पाण्याने नेस्तनाबूत झाले आहेत. शेतकऱ्यांची आरडाओरड आहे. बंधाऱ्याच्या बांधकामात अनेक अनियमितता समोर आली आहे. या कृषी बंधाऱ्याची चौकशी होणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)