आई-वडिलांचे छत्र हिरावल्याने चिमुकले झाले अनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST2021-08-23T04:31:00+5:302021-08-23T04:31:00+5:30

लोहारा : आजारामुळे महिनाभरात आई-वडिलांचा एका पाठोपाठ मृत्यू झाल्याने तीन चिमुकले अनाथ झाले असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न झाला आहे. ...

Chimukle became an orphan after losing the umbrella of his parents | आई-वडिलांचे छत्र हिरावल्याने चिमुकले झाले अनाथ

आई-वडिलांचे छत्र हिरावल्याने चिमुकले झाले अनाथ

लोहारा : आजारामुळे महिनाभरात आई-वडिलांचा एका पाठोपाठ मृत्यू झाल्याने तीन चिमुकले अनाथ झाले असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न झाला आहे. ही घटना देवरी तालुक्यातील डवकी येथे घडली. दरम्यान, या चिमुकल्यांच्या मदतीसाठी मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे.

प्राप्त माहितीनुसार देवरी तालुक्यातील डवकी येथील प्रकाश खेलुराम उईके यांचे आजाराने निधन झाले. त्यानंतर महिनाभरातच पत्नी लता प्रकाश उईके हिचे सुद्धा मृत्यू झाला. त्यामुळे चार वर्षांची राजनंदिनी, सात वर्षांची डिलेश्वरी व दहा वर्षांची संध्या तिन्ही बहिणी अनाथ झाल्या. त्यामुळे त्यांचे आजी-आजोबा त्यांचा सांभाळ करीत आहे. मात्र तिन्ही बहिणींवरील आई-वडिलांचे छत्र हिरावल्याने त्यांच्यासमोर जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच जि. प. शाळेच्या शिक्षकांनी या चिमुकल्यांना मदत करण्याचा संकल्प केला. जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा डवकी येथील शिक्षक डी. बी. लांजेवार मुख्याध्यापक, एस. जी. कश्यप, एल. बी. तितराम, डी. एस. सोळी, व्ही. टी. बहेकार, ए. एच. डोंगरे यांनी जीवनावश्यक वस्तू व सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

Web Title: Chimukle became an orphan after losing the umbrella of his parents