भरकटलेले बालक अजूनही दिशाहीन

By Admin | Updated: November 14, 2015 01:54 IST2015-11-14T01:54:36+5:302015-11-14T01:54:36+5:30

शिक्षणाची वाट सोडून बालमजुरी करणारे बालक, भरकटलेले, अपहरण झालेल्या किंवा मात्यापित्यांचे छत्र हरपलेल्या बालकांची जिल्ह्यात अजूनही वाताहात होत आहे.

The child who is still in a state is still directionless | भरकटलेले बालक अजूनही दिशाहीन

भरकटलेले बालक अजूनही दिशाहीन

नरेश रहिले गोंदिया
शिक्षणाची वाट सोडून बालमजुरी करणारे बालक, भरकटलेले, अपहरण झालेल्या किंवा मात्यापित्यांचे छत्र हरपलेल्या बालकांची जिल्ह्यात अजूनही वाताहात होत आहे. या बालकांचे संगोपन करणारे जिल्ह्यातील दोन बालसदन केंद्र व बालकामगारांसाठी चालविण्यात येणाऱ्या ४० बालसंक्रमण शाळा बंद पडल्या आहेत. त्यामुळे निराधार बालकांचा जिल्ह्यात आधारच राहिलेला नाही. येथील महिला व बालविकास कार्यालयाच्या उदासीनतेमुळे बालकांना आधार देण्यासाठी बालसदन केंद्र नाही.
जिल्ह्यात तीन बालसदन केंद्र उघडण्यात आले होते. ज्या बालकांना संरक्षणाची गरज असते त्या बालकांना तिथे ठेवून त्यांचे संगोपन केले जाते. परंतु हे बालसदन केंद्र चालविणाऱ्या संस्थांकडून बालकांची योग्य देखरेख केली जात नसल्यामुळे तीनपैकी दोन बालसदन केंद्र बंद पाडण्यात आले आहेत. देवरी येथे फक्त एक बालसदन केंद्र सुरू असून तिथे २० च्या संख्येत बालकांची संख्या आहे. देवरी वगळता तिरोडा तालुक्याच्या नवेझरी येथील तर गोंदियाच्या कुंभारेनगरातील बालसदन केंद्र बंद करण्यात आले आहे. तेथील संस्था संस्थासंचालकांचा हलगर्जीपणा असल्यामुळे हे बाल सदन केंद्र बंद पाडण्यात आले आहेत.
गोंदिया जिल्ह्यातून बालमजूरी संपविण्यासाठी बालसंक्रमण ४० बाल संक्रमण शाळा तयार करण्यात आल्या होत्या. परंतु त्या शाळा २०१२ पासून बंद आहेत. चार वर्षापूर्वी गोंदियात १४७७ बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता जिल्ह्यातील विविध भागांत ४० बालसंक्रमण शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र या शाळांत शिक्षण घेत असलेल्या बालकामगारांना अभ्यासाकरिता लागणारे साहित्य व अन्य गोष्टी देण्याकरिता प्रशासनाकडे नसल्यामुळे त्या बालसंक्रमण शाळा बंद करण्यात आल्या.परिणामी आता जिल्ह्यात बालमजूरांची संख्या ५००० च्या घरात आहे.
शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत काही वर्षांपूर्वी इंदस प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता. या जिल्ह्यांमध्ये गोंदिया जिल्ह्याचादेखील समावेश होता. मात्र जिल्ह्यात ४० बालसंक्रमण शाळा सुरू करण्यात आल्या होत्या.
बालमजुरी करणाऱ्या ९ ते १३ वर्षे वयोगटातील १४७७ बालकांना मजुरी करण्यास थांबवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य सुरू असताना याचे कंत्राट दोन संस्थाना देण्यात आले होते. तिरोडा तालुक्यात १०, देवरी ११, सडक/अर्जुनी दोन, अर्जुनी/मोरगाव दोन, आमगाव दोन, गोंदिया ११ व सालेकसा तालुक्यात दोन बालसंक्रमण शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. यासाठी १९४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये ११९ शिक्षक, ४० महिला सहायक व लिपिकांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पध्दतीने शासनाकडे पाठपुरावा करून बालसंक्रमण शाळा डॉ. अमित सैनी यांनी बंद पाडल्या. प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्थेला ४० व प्रयास सामाजिक संस्था, भंडाराला २० शाळा देण्यात आल्या आहेत. त्या आता बंद झाल्या आहेत. मात्र हा प्रकल्प बंद पडल्याने जिल्ह्यात पाच हजाराच्या घरात बालकामगार धोक्याच्या ठिकाणी काम करीत आहेत. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाचे किंवा त्यांतर्गत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष आहे. बाल मजूरांसाठी फक्त सरकारच्या पाच शाळा सुरू असल्याची माहिती आहे.

सर्वेक्षण झालेच नाही
बालमजीरांचे सर्वेक्षण करण्यासाठी सन २०१२ मध्ये जिल्हाधिकारी डॉ, अमित सैनी यांनी काही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पाठविले. परंतु ते कर्मचारी बाल संक्रमण शाळात गेल्यावर काही ठिकाणी बालके कमी आढळली. त्यांनी शहरात असलेल्या बालमजूरांचे सर्वेक्षण करायला हवे होते. कामगार कार्यालयाच्या सहकार्याने त्यांनी बालमजूरांचे सर्वेक्षण न करता बालमजूर नाहीत असा चुकीचा अहवाल सादर केल्यामुळे जिल्ह्यातील बालसंक्रमण शाळा बंद पडल्या आहेत.

Web Title: The child who is still in a state is still directionless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.