खुटकटाईत बालमजुरांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:16 IST2018-03-15T00:16:49+5:302018-03-15T00:16:49+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी, कोसमतोंडी व जांभळी परिसरात मुन्सी वर्गाकडून खुटकटाई करण्यासाठी बालमजुरांना सहभागी केले जात आहे.

खुटकटाईत बालमजुरांचा समावेश
ठळक मुद्देकारवाईची मागणी : शासनाची उपाययोजना ठरतेय निष्फळ
ऑनलाईन लोकमत
पांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी, कोसमतोंडी व जांभळी परिसरात मुन्सी वर्गाकडून खुटकटाई करण्यासाठी बालमजुरांना सहभागी केले जात आहे. त्यामुळे शासनाने बालमजुरीवर आळा घालण्यासाठी केलेली उपाययोजना निष्फळ ठरताना दिसून येत आहे.
पांढरी, कोसमतोंडी व जांभळी परिसरामध्ये तेंदूपत्ता संकलनाची निविदा वडेरा कंपनीला मंजूर करण्यात आली. त्यांच्यामार्फत लहान बालकांना कमी पैसे देऊन मोठ्या प्रमाणात नफा कमविताचे षडयंत्र केले जात आहे.
या प्रकरणाची बालगुन्हेगारी कायद्यामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.