बाल विकास मंचची सदस्यता नोंदणी जोरात
By Admin | Updated: August 18, 2016 00:23 IST2016-08-18T00:23:59+5:302016-08-18T00:23:59+5:30
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करवून देणाऱ्या लोकमत बाल विकास ...

बाल विकास मंचची सदस्यता नोंदणी जोरात
गोंदिया : विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करवून देणाऱ्या लोकमत बाल विकास मंचची सदस्यता नोंदणी जोरात सुरू असून आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक बालकांनी सदस्यता ग्रहण केली आहे. लोकमत जिल्हा कार्यालयात दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत नोंदणी केली जात आहे.
बालविकास मंचच्या माध्यमातून १५ वर्षे वयोगटापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक , सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करवून देत पुढे आणले जाते. यात नृत्य, भाषण, चित्रकला, स्केटींग, सुवाच्छ अक्षर, विविध विषयांवर कार्यशाळा यासारखे एकाहून एक उपक्रम राबविले जातात. एकंदर विद्यार्थ्यांना वर्षभर विविध मनोरंजक कार्यक्रमांची मेजवानी दिली जाते.
बाल विकास मंचची सदस्यता घेणाऱ्यांना आकर्षक ओळखपत्र, २०४ रूपये किंमतीची आकर्षक वॉटर बॉटल, डायमंड नमकीन, भोजवानी फुड्स, खिंडसी वॉटरपार्क कूपन, नर्मदा आर्ट गॅलरीकडून ४/६ आकाराचा फोटो, कवरराम बेकरीकडून पेस्ट्री कूपन, हेअर टच सलूनकडून हेअर कटींग कूपन, डॉ. सोमाणी यांच्याकडून डेंटल चेकअप कूपन, प्रेरणा केक्सकडून कप केक कूपन, एस.एस.एस. कोचिंग क्लासेसकडून बॉलपेन कूपन हमखास दिले जाणार आहेत. यासाठी १५० रूपये सदस्यता शुल्क आकारले जात आहे.
या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन लोकमत बाल विकास मंचचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) यांनी केले आहे.