प्लॉटची विक्री करून केली फसवणूक
By Admin | Updated: February 11, 2016 02:03 IST2016-02-11T02:03:10+5:302016-02-11T02:03:10+5:30
तिरोडा येथील जागृती बँकेत गहाण ठेवलेला प्लॉट अन्य एका व्यक्तीला विक्री करून त्याची फसवणूक करणाऱ्या गोंदियाच्या सहयोग कॉलनीच्या ..

प्लॉटची विक्री करून केली फसवणूक
प्लॉट ठेवला होता गहाण : तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गोंदिया : तिरोडा येथील जागृती बँकेत गहाण ठेवलेला प्लॉट अन्य एका व्यक्तीला विक्री करून त्याची फसवणूक करणाऱ्या गोंदियाच्या सहयोग कॉलनीच्या गौरीशंकर नगरातील ईश्वरलाल धर्माजी पारधी (४३) याच्याविरुद्ध तिरोडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तिरोडाच्या संत रविदास वॉर्डातील विनोद मोहन हरिणखेडे (४१) यांना आरोपी ईश्वरलाल पारधी याने त्याच्या मालकीचा चंद्रभागा रोड, संत रविदास वार्ड, तिरोडा येथील गट क्रमांक ७५/७६ (१) ट, आराजी १८०० चौरस फूट प्लॉट त्याने २०१० पूर्वी तिरोडाच्या जागृती बँकेत गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेतले. ते कर्ज परतफेड न करता त्याच प्लाटला नऊ लाखात विकण्याचा सौदा विनोद हरिणखेडे यांच्याशी केला. १२ मार्च २०१५ रोजी आरोपी ईश्वरलाल पारधी याने हरिणखेडे यांच्याकडून ३ लाख रुपये बयाना घेवून रजिस्ट्री करुन देण्याचे कबुल केले. परंतु तीन महिन्याची मुदत उलटूनही त्याने रजिस्ट्री करुन दिली नाही. सदर घटनेसंदर्भात त्याच्याविरुद्ध तिरोडा पोलिसांनी भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)