महिलेला अपशब्दात बोलणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:31 IST2021-09-26T04:31:41+5:302021-09-26T04:31:41+5:30

.................. भेटायला न आल्यास व्हिडिओ वायरल करण्याची तरुणीला धमकी गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या संजयनगर पिंडकेपार येथील एका ...

Charges filed against two persons for insulting a woman | महिलेला अपशब्दात बोलणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

महिलेला अपशब्दात बोलणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

..................

भेटायला न आल्यास व्हिडिओ वायरल करण्याची तरुणीला धमकी

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या संजयनगर पिंडकेपार येथील एका २२ वर्षांच्या तरुणीला मध्य प्रदेशच्या बेला येथील २६ वर्षांचा तरुण आरोपी विकेश चौरे याने फोन करून मला भेटायला ये, जर तू भेटायला आली नाहीस तर तुझा व्हिडिओ आणि फोटो मी सोशल मीडियावर व्हायरल करीन, अशी धमकी दिली. त्या मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गोंदिया शहर पोलिसांनी २५ सप्टेंबर रोजी भादंवि कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

............

सिंगलटोली येथे नळाचे पाणी पेटले

गोंदिया : शहराच्या सिंगलटोली येथील अजय चौरे यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या शीला प्रशांत डोंगरे (वय ४५) या महिलेने नळाच्या पाण्यावरून नीलिमा विक्रम दिघोरे (वय ३४, रा. सिंगलटोली गोंदिया) यांच्याशी २३ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता वाद करून त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. इतकेच नव्हे तर ठार करण्याची धमकी दिली. तक्रारीवरून २४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी आरोपी शीला डोंगरे विरुद्ध भादंवि कलम ३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुन्हा नीलिमा यांना २० वर्षांच्या तरुणीने धक्काबुक्की, शिवीगाळ व मारहाण केल्याच्या प्रकरणावरून भादंवि कलम ३२३, ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

..............

मुलाने केली आईला मारहाण

गोंदिया : संजयनगर मुर्री येथील आरोपी सूरज रमेश कटरे (वय ३५) याने आपल्या विधवा आईला तू कामावर का जात नाहीस म्हणून तिला शिवीेगाळ करून तिला मारहाण केल्याची घटना २४ सप्टेंबरच्या सकाळी ८ वाजता घडली. अनुसया रमेश कटरे (६०) या आईच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध भादंवि कलम ३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Charges filed against two persons for insulting a woman