मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST2021-09-08T04:35:19+5:302021-09-08T04:35:19+5:30

...................... माझ्या गोष्टी करता म्हणून तरुणाला मारहाण गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम चुटिया येथील अश्विन हिरालाल उईके (वय ...

Charges filed against four assailants | मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

......................

माझ्या गोष्टी करता म्हणून तरुणाला मारहाण

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम चुटिया येथील अश्विन हिरालाल उईके (वय २२) या तरुणाला आरोपी धनलाल गोपीचंद शरणागत (५५, रा. चुटिया) यांनी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता माझ्याविषयी गोष्टी करता म्हणून डोक्यावर मारले. या संदर्भात शहर पोलिसांनी ७ सप्टेंबर रोजी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

..........

चार दारूविक्रेत्यांवर कारवाई

गोंदिया : शहर पोलिसांनी पोळ्याच्या दिवशी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी शहरातील विविध भागांतील चार दारू विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याजवळून मोहफुलाची दारू जप्त केली. यामध्ये चुटिया येथील हरिलाल देवीलाल बारई (वय ४५) याच्याकडून मोहफुलाची १३ लिटर दारू पोलीस शिपाई सुभाष सोनवणे यांनी जप्त केली. गौतम बुद्ध वाॅर्ड, लक्ष्मीनगर येथील सायना सुशील कडवे (३५) या महिलेकडून मोहफुलाची २० लिटर दारू पोलीस नाईक सुबोध बिसेन यांनी जप्त केली. गौतमनगरातील प्रभा संजय प्रेम (४८) या महिलेकडून मोहफुलाची २५ लिटर दारू पोलीस नाईक सोमेश्वर मेश्राम यांनी जप्त केली. भीमनगरातील तोमेश अजय राऊत (२२) यांच्याकडून मोहफुलाची १२ लिटर दारू जप्त पोलीस नाईक अरविंद चौधरी यांनी जप्त केली. चारही आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.................

Web Title: Charges filed against four assailants