विनाकारण फिरणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:29 IST2021-05-13T04:29:32+5:302021-05-13T04:29:32+5:30

चाैथी कारवाई त्रिमूर्ती चौक रावणवाडी येथे दुपारी १२ वाजता पोलीस शिपाई श्रीकांत राधेश्याम नागपुरे यांनी केली आहे. पाचवी ...

Charges filed against eight persons | विनाकारण फिरणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल

विनाकारण फिरणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल

चाैथी कारवाई त्रिमूर्ती चौक रावणवाडी येथे दुपारी १२ वाजता पोलीस शिपाई श्रीकांत राधेश्याम नागपुरे यांनी केली आहे. पाचवी कारवाई अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लाखांदूर टी पॉईंट महाराणा प्रताप चौक येथे करण्यात आली. आरोपी दुचाकीने (एम. एच. ३६, बी. ४३९१) विनाकारण फिरताना मिळाला. सहावी कारवाई लाखांदूर टी पॉईंट महाराणा प्रताप चौक अर्जुनी-मोरगाव येथे दुचाकीने (एम. एच. ३५, एबी १६६४) विनाकारण फिरतांना आढळला. सातवी कारवाई दुचाकीने (एम. एच. ३५ एबी १६६४) विनाकारण फिरतांना मिळाला. ही कारवाई पोलीस हवालदार अशोक राऊत यांनी केली आहे. आठवी कारवाई गोंदिया शहर पोलिसांनी केली आहे. १० आरोपी ११ मे रोजी सकाळी ११.३० वाजता गोंदियाच्या भाजी बाजारात विनाकारण घराबाहेर फिरत असल्याने पोलीस नाईक विजय गायधने यांनी केली. संबंधित पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८,२६९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार सोनवाने करीत आहेत.

Web Title: Charges filed against eight persons