दावा नाकारणार्या विमा कंपनीला चपराक
By Admin | Updated: June 9, 2014 23:41 IST2014-06-09T23:41:45+5:302014-06-09T23:41:45+5:30
शेतकरी अपघात विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्या आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीला ग्राहक मंचाने संबंधित मृत शेतकर्याच्या वारसांना विम्याचा लाभ देण्याचा आदेश दिला.

दावा नाकारणार्या विमा कंपनीला चपराक
गोंदिया : शेतकरी अपघात विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्या आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीला ग्राहक मंचाने संबंधित मृत शेतकर्याच्या वारसांना विम्याचा लाभ देण्याचा आदेश दिला.
तालुक्यातील महारिटोला येथे उमराव पंधरे यांची पत्नी रैनाबाई पंधरे यांचा १५ नोव्हेंबर २00५ रोजी पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. हा त्यांचा अपघाती मृत्यू असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शेतकरी अपघआत विमा योजनेनुसार, आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीकडे १ लाख रुपये मिळण्यासाठी सर्व कागदपत्र सुपूर्त केले. परंतु विमा कंपनीने तो दावा मंजूर अथवा नामंजूर केल्याचे त्यांना कळविले नाही. त्यामुळे मृत महिलेचा मती गजानन पंधरे यांनी विम्याचे एक लाख रुपये द.सा.द.शे. १८ टक्के व्याजासह व झालेल्या त्रासाचे १0 हजार आणि आतापर्यंत आलेल्या खर्चाचे १0 हजार मिळण्यासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे धाव घेतली.
विमा कंपनीने आपली बाजू स्पष्ट करताना घडलेल्या घटनेचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे तक्रारकर्त्यांचा हा विमा प्रलंबित ठेवण्यात आल्याचे सांगितले. परंतु तक्रारकर्त्यांचे वकील अँड.उदय क्षीरसागर यांनी मंचापुढे आपली बाजू मांडताना तक्रारकर्त्यांच्या पत्नीचा मृत्यू हा पुराच्या पाण्यात बुडूनच झाला हे सिद्ध होत असल्याचे सांगितले. यावर तक्रारकर्ता व विरोधी पक्षाची बाजू ऐकूण घेत न्यायमंचाने तक्रारकर्त्यांस शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेंतर्गत एक लाख रुपये व तक्रार केल्याच्या दिनांकापासून ते आतापर्यंत संपूर्ण पैसे वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. १0 टक्के दराने द्यावे, एवढेच नव्हे तर झालेल्या त्रासाची नुकसानभरपाई म्हणून पाच हजार रुपये व आतापर्यंत झालेला खर्च तीन हजार रुपये हे सर्व आदेश दिल्यापासूनच्या ३0 दिवसात देण्यास सांगितले. यामुळे मृत शेतकर्याच्या वारसांना दिलासा मिळाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)