चान्ना जि. प. प्राथमिक शाळेतील ‘त्या’ शिक्षकास हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST2021-08-23T04:31:40+5:302021-08-23T04:31:40+5:30

बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चान्ना (बाक्टी) येथील जिल्हा परिषद आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षक ...

Channa Dist. W. Delete 'that' teacher in primary school | चान्ना जि. प. प्राथमिक शाळेतील ‘त्या’ शिक्षकास हटवा

चान्ना जि. प. प्राथमिक शाळेतील ‘त्या’ शिक्षकास हटवा

बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चान्ना (बाक्टी) येथील जिल्हा परिषद आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षक पी. पी. मोहबंशी यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी असा ठराव शाळा व्यवस्थापन समितीने एकमताने मंजूर केला आहे. संबंधितांनी वेळीच कारवाई केली नाही तर शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद आंदोलन करण्यास येईल, असा इशारा शाळा समितीने दिला आहे.

चान्ना येथील जिल्हा परिषद शाळा ही एक आदर्श शाळा म्हणून गौरवली आहे. या ठिकाणी कार्यरत असलेले सहायक शिक्षक पी. पी. मोहबंशी यांनी वर्ग वाटपावरून गावातील पालकांमध्ये शाळेविषयी असंतोष निर्माण केला. काही पालकांशी प्रत्यक्ष भेटून शाळेतून आपल्या पाल्याचे नाव काढा, असा चुकीचा संदेश देऊन विद्यार्थी संख्या कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले. अर्जित रजेचा कारण देऊन शाळेला बुटी मारणे, अनेक सबबींखाली रजेवर जाण्याचा त्यांनी मार्ग पत्कारल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेविषयी गैरसमज पसरवून शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याचा मनसुबा करणाऱ्या ‘त्या’ शिक्षकास त्वरित हटवून नव्या शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी यांनी ठरावासह निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ‘त्या’ शिक्षकाला हटविण्यात आले नाही तर शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे.

Web Title: Channa Dist. W. Delete 'that' teacher in primary school