रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल

By Admin | Updated: December 4, 2015 01:57 IST2015-12-04T01:57:00+5:302015-12-04T01:57:00+5:30

रेल्वे प्रवाशांच्या सोयी-सुविधा लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने २९ नोव्हेंबरपासून गोंदिया-बालाघाट-कटंगीदरम्यान ...

Changes in train time | रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल

रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल

गोंदिया : रेल्वे प्रवाशांच्या सोयी-सुविधा लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने २९ नोव्हेंबरपासून गोंदिया-बालाघाट-कटंगीदरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल केला होता. बालाघाट क्षेत्रातील नागरिक व लोकप्रतिनिधींनी शासकीय कर्मचारी व शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेवून नवीन वेळापत्रकात बदल करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाला केली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने ३ डिसेंबर २०१५ पासून वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला.
आता नवीन वेळापत्रकानुसार गोंदिया ते कटंगीसाठी पहाटे ४.३० वाजता व कटंगी ते गोंदियासाठी सकाळी ७.५० वाजता गाडी उपलब्ध होईल. याशिवाय गाडी क्रमांक (७८८१०) बालाघाट-गोंदिया या गाडीला कटंगीपर्यंत विस्तारित करण्यात आले आहे. बालाघाट ते कटंगीकडे एक नवीन गाडीसुद्धा (७८८२३) सुरू करण्यात आली आहे. गोंदिया ते कटंगीसाठी सकाळी ८.४५ वाजता जाणारी गाडी आता ९ वाजता व गोंदिया ते बालाघाट ही गाडी रात्री रात्री ११.३० वाजता सुटणार आहे.

मेगा ब्लॉकमुळे रेल्वेगाड्या होणार प्रभावित
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत दुर्ग-गोंदिया-कळमना अप-लाईन ट्रॅकवर देखभाल दुरूस्तीसाठी ४ व १८ डिसेंबर २०१५, १ व १५ जानेवारी २०१६, तसेच २९ जानेवारीच्या रात्री ८.४० वाजता ते दुसऱ्या दिवशी १२.४० वाजतापर्यंत चार तासांचा मेगा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे गाडी (६८७२९) रायपूर-डोंगरगड मेमू गाडीला दुर्ग स्थानकावरच थांबविण्यात येईल. गाडी (१८२३९) गेवरा रोड-नागपूर-शिवनाथ एक्सप्रेसला एक तास व (५८१११) टाटानगर-इतवारी पॅसेंजरला १५ मिनिटे दुर्ग स्थानकावर थांबविण्यात येणार आहे.

Web Title: Changes in train time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.