मतदान केंद्र व इमारतीत बदल

By Admin | Updated: October 5, 2014 23:08 IST2014-10-05T23:08:20+5:302014-10-05T23:08:20+5:30

येत्या १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील सहाय्यकारी मतदान केंद्र व मतदान केंद्र इमारतीच्या बदलास निवडणूक

Change in polling station and building | मतदान केंद्र व इमारतीत बदल

मतदान केंद्र व इमारतीत बदल

गोंदिया : येत्या १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील सहाय्यकारी मतदान केंद्र व मतदान केंद्र इमारतीच्या बदलास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.
यामध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात सहाय्यकारी मतदान केंद्र कनेरी-२९४ अ, जि.प. प्राथमिक शाळा कनेरी, यादी भाग क्र. २९४ मधील अ.क्र. १ ते ६५२ मतदार, कनेरी २९४-ब, जि.प. प्राथमिक शाळा कनेरी, यादी भाग क्र.२९४ मधील अ.क्र.६५३ ते १३०१ मतदार असतील.
तिरोडा विधानसभा मतदारसंघातील तिरोडा ७९ अ, जि.प. उत्तर बुनियादी शाळा तिरोडा (उत्तर भाग) खोली क्र. ४, यादी भाग क्र. ७९ मधील अ.क्र.१ ते ६३९ व १३५२ ते १४६२ मतदार, तिरोडा ७९-ब, जि.प. उत्तर बुनियादी शाळा बुनियादी शाळा तिरोडा (उत्तर भाग) खोली क्र. २, यादी भाग क्र.७९ मधील अ.क्र.६४० ते १३५१ व १४६३ ते १४८१ मतदार असतील.
गोंदिया विधानसभा मतदारसंघातील फुलचूरटोला ३०३ अ, जि.प. मराठी प्रायमरी शाळा फुलचूरपेठ, यादी भाग क्र.३०३ मधील अ.क्र.१ ते १००० मतदार, फुलचूरटोला ३०३ ब, जि.प. प्राथमिक शाळा फुलचूरपेठ, यादी भाग क्र. ३०३ मधील अ.क्र.१००१ ते १५१० मतदार, गोंदिया १६९ अ, न.प. पूर्व माध्यमिक हिंदी शाळा मरारटोली गोंदिया, यादी भाग क्र.१६९ मधील अ.क्र. १ ते १००० मतदार. गोंदिया १६९ ब, न.प.पूर्व माध्यमिक हिंदी शाळा मरारटोली गोंदिया, यादी भाग क्र. १६९ अ.क्र. १००१ ते १४८२ मतदार असतील.
मतदार केंद्र इमारतीत बदल मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे करण्यात आलेला आहे. तिरोडा विधानसभा मतदारसंघातील अर्जुनी ८, जि.प. केंद्र प्राथमिक शाळा अर्जुनी या इमारतीत बदल झाले असून त्याऐवजी आता अर्जुनी ८, जि.प. केंद्र प्राथमिक शाळा अर्जुनी (पूर्व भागातील लागून असलेली इमारत). केसलवाडा-१११, जि.प. पूर्व माध्यमिक शाळा केसलवाडा (उत्तर भाग) या इमारतीने बदल झाले असून त्याऐवजी आता केसलवाडा-१११ जि.प. पूर्व माध्यमिक शाळा (पूर्वकडील नवीन इमारत). केसलवाडा-११२, जि.प. पूर्व माध्यमिक शाळा केसलवाडा (उत्तर भाग) या इमारतीऐवजी आता केसलवाडा -१११ जि.प. पूर्व माध्यमिक शाळा (पूर्व कडील नविन इमारत). एकोडी-१२४, जि.प. पूर्व माध्यमिक शाळा एकोडी (दक्षिण भाग) या इमारती ऐवजी आता एकोडी-१२४ जि.प. भारतीय कनिष्ठ महाविद्यालय एकोडी (दक्षिण कडील खोली क्र.१). एकोडी-१२५, जि.प. पूर्व माध्यमिक शाळा एकोडी (दक्षिण भाग) या इमारतीऐवजी आता एकोडी-१२५ जि.प. भारतीय कनिष्ठ महाविद्यालय एकोडी (उत्तरेकडे मुख असलेली खोली क्र.२). एकोडी-१२६, जि.प. पूर्व माध्यमिक शाळा एकोडी या इमारतीऐवजी आता एकोडी-१२६ जि.प. भारतीय कनिष्ठ महाविद्यालय एकोडी (दक्षिणेकडील इमारत) सर्व शिक्षा अभियानअंतर्गत नविन बांधकाम असलेली इमारत. चिखली-१५३, जि.प. केंद्र पूर्व माध्यमिक शाळा चिखली या इमारतीऐवजी आता चिखली-१५३ जि.प. केंद्र पूर्व माध्यमिक शाळा चिखली (लागून असलेली खोली). धामनेवाडा-१५५ जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा धामनेवाडा या इमारतीऐवजी आता धामनेवाडा-१५५ जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा धामनेवाडा (सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सटकोनी खोलीमध्ये नविन बांधकाम असलेली इमारत). मेंढा-१६३ जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा मेंढा (उत्तर भाग) या इमारतीऐवजी आता मेंढा-१६३ जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा मेंढा(दुसरी खोली). मेंढा-१६४ जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा मेंढा (दक्षिण भाग) या इमारतीऐवजी आता मेंढा-१६४ जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा मेंढा (नविन खोली). सतोना-१७४ जि.प. पूर्व माध्यमिक शाळा सतोना या इमारतीऐवजी आता सतोना-१७४ जि.प. पूर्व माध्यमिक शाळा सतोना (गेट जवळील पश्चिमेकडील नविन इमारत). बोदलकसा-२१० जि.प. पूर्व माध्यमिक शाळा बोदलकसा (वस्ती शाळा) या इमारती ऐवजी आता बोदलकसा-२१० जि.प. पूर्व माध्यमिक शाळा बोदलकसा (नविन इमारत).
गोंदिया विधानसभा मतदारसंघातील १८-काटी जि.प. हिंदी प्राथमिक शाळा काटी या इमारती ऐवजी आता १८-काटी जि.प. हिंदी प्राथमिक शाळा काटी या इमारतीऐवजी आता १८-मरारटोला (काटी) जि.प. शाळा मरारटोला (काटी). १९-काटी जि.प. हिंदी प्राथमिक शाळा काटी या इमारती ऐवजी आता १०-मरारटोला (काटी) जि.प. शाळा मरारटोला (काटी). १७२-गोंदिया (शहरी क्षेत्र) न.प. सावित्रीबाई फुले मराठी प्राथमिक शाळा मरारटोली गोंदिया या इमारती ऐवजी आता १७२-गोंदिया (शहरी क्षेत्र) न.प. मराठी/हिंदी रेलटोली प्राथमिक शाळा गोंदिया.१९४-गोंदिया (शहरी क्षेत्र) महावीर मारवाडी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा या इमारतीऐवजी आता १९४-गोंदिया (शहरी क्षेत्र) मनोहर म्युनिसीपल हायर सेकंडरी शाळा गोंदिया. २०४-गोंदिया (शहरी क्षेत्र) जे.एम.हायस्कूल सिव्हील लाईन गोंदिया या इमारतीऐवजी आता २०४-गोंदिया (शहरी क्षेत्र) न.प. मराठी/हिंदी गणेशनगर पूर्व माध्यमिक शाळा गोंदिया. २१८-गोंदिया (शहरी क्षेत्र) सेठ प्रताप मराठी टाऊन शाळा न.प. गोंदिया या इमारतीऐवजी आता २१८-गोंदिया (शहरी क्षेत्र) आदर्श सिंधी विद्यालय गोंदिया. २२०-गोंदिया (शहरी क्षेत्र) सेठ प्रताप मराठी टाऊन शाळा न.प. गोंदिया या इमारती ऐवजी आता २२०-गोंदिया (शहरी क्षेत्र) आदर्श सिंधी विद्यालय गोंदिया. २७०-गोंदिया (शहरी क्षेत्र) एन.एम.डी.कॉलेज गोंदिया या इमारती ऐवजी आता २७०-गोंदिया (शहरी क्षेत्र) संत तुकाराम हायस्कूल कुडवा नाका गोंदिया. २७१-गोंदिया (शहरी क्षेत्र) एन.एम.डी.कॉलेज गोंदिया या इमारती ऐवजी आता २७१-गोंदिया (शहरी क्षेत्र) संत तुकाराम हायस्कूल कुडवा नाका गोंदिया. २७३-गोंदिया (शहरी क्षेत्र) न.प. मराठी/हिंदी रेलटोली प्राथमिक शाळा गोंदिया या इमारती ऐवजी आता २७३-गोंदिया (शहरी क्षेत्र) संत तुकाराम हायस्कूल कुडवा नाका गोंदिया. २७४-गोंदिया (शहरी क्षेत्र) न.प.मराठी/हिंदी रेलटोली प्राथमिक शाळा गोंदिया या इमारतीऐवजी आता २७४-गोंदिया (शहरी क्षेत्र) संत तुकाराम हायस्कूल कुडवा नाका गोंदिया. ३३२-गुदमा जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा गुदमा या इमारतीऐवजी आता ३३२-आवारीटोला (गुदमा) जि.प. नविन प्राथमिक शाळा आवारीटोला.
आमगाव विधानसभा मतदारसंघातील २७३-कोसबी (बु.) जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा कोसबी या इमारतीऐवजी आता २७३-कोसबी (बु.) आंगणवाडी केंद्र कोसबी (बु.) येथे मतदान होणार आहे. संबंधित मतदारसंघामध्ये सहाय्यक मतदार केंद्र व मतदान केंद्र इमारतीमध्ये जो बदल झालेला आहे याची नोंद मतदारांनी घेऊन मतदानाच्या दिवशी वरील ठिकाणी मतदानासाठी जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले आहे.

Web Title: Change in polling station and building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.