विकासकामांसंदर्भात चंद्रिकापुरे यांची उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST2021-01-22T04:27:13+5:302021-01-22T04:27:13+5:30

विधानसभा क्षेत्रातील विकासकामांसंदर्भात आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील विधानभवनात चर्चा केली. ...

Chandrikapure discusses with Deputy Chief Minister regarding development works () | विकासकामांसंदर्भात चंद्रिकापुरे यांची उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा ()

विकासकामांसंदर्भात चंद्रिकापुरे यांची उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा ()

विधानसभा क्षेत्रातील विकासकामांसंदर्भात आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील विधानभवनात चर्चा केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र राज्याच्या टोकावर आहे. या मतदारसंघांत अनेक समस्या आहेत. आजतागायत लोकप्रतिनिधींनी याकडे सातत्याने कानाडोळा केला. सिंचन, कृषी, पर्यटन याबाबतीत हा मतदारसंघ संपन्न आहे. मात्र, या क्षेत्रात विकासाला बराच वाव आहे. मतदारसंघात रोजगाराची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील युवावर्ग मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी शोधत शहराकडे धाव घेतो, याकडे पवार यांचे लक्ष वेधले. विकासकामे करण्यासाठी या मतदारसंघाला अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Web Title: Chandrikapure discusses with Deputy Chief Minister regarding development works ()