शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

केंद्र सरकारची प्रतिकात्मक शवयात्रा काढून केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 05:00 IST

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने दरवाढ केली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. जनतेला मोठी आणि खोटी स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा आता खरा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे. याचा निषेध नोंदवित जिल्हा युवक काँग्रेसच्या मार्गदर्शनात तालुका विधानसभा, शहर युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दुपारी १२ वाजता स्थानिक शहीद भोला काँग्रेस भवन येथून प्रतिकात्मक शवयात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्देमुंडण केलेले केस पाठविणार पीएमओ कार्यालयाला पाठविणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा गोंदिया जिल्हा व शहर युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी (दि.९) प्रतिकात्मक शवयात्रा काढून व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. मुंडण केलेले केस पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्याचा संकल्प केला. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने दरवाढ केली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. जनतेला मोठी आणि खोटी स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा आता खरा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे. याचा निषेध नोंदवित जिल्हा युवक काँग्रेसच्या मार्गदर्शनात तालुका विधानसभा, शहर युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दुपारी १२ वाजता स्थानिक शहीद भोला काँग्रेस भवन येथून प्रतिकात्मक शवयात्रा काढण्यात आली. यानंतर ही प्रतिकात्मक शवयात्रा जयस्तंभ चौकात पोहचली. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने केली. तसेच केंद्र सरकारच्या धोरणाचा मुंडण करून निषेध नोंदविला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. नामदेव किसान, काँग्रेस प्रदेश सचिव अमर वऱ्हाडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष जहीर अहमद, गोंदिया जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अलोक मोहंती, अध्यक्ष हरीश तुळसकर,माजी आमदार दिलीप बन्सोड, युवक नेते अशोक गुप्ता, तालुका काँग्रेस अध्यक्ष सूर्यप्रकाश भगत, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबा बागडे, शहर अध्यक्ष रवी चौरसिया, जिल्हा उपाध्यक्ष अजहर खान, शहर अध्यक्ष शेख, तालुका अध्यक्ष शैलेश भिसे, जिल्हा उपाध्यक्ष कीर्ती येरणे,  मंगल नंदेश्वर, राहुल  खाडे, योगेश उके, दीपेश अरोरा, वारिस भगत, अभिषेक जैन, नीलम हलमारे, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कटरे, राजकुमार पटले, पंकज राजकुमार बागडे, रवी चौरसिया, शैलेश बिसेन आदी यात सहभागी झाले होते. 

दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन डिझेल व पेट्रोलच्या वाढलेल्या किमती, खाद्यतेल व गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे केंद्र सरकार विरोधात नारेबाजी करीत शवयात्रा काढण्यात आली. युवा कार्यकर्ता जनक फुंडे यांनी मुंडण करून आपले केस नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पाठविणार आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची किमती कमी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दिला.

 

टॅग्स :agitationआंदोलनPetrolपेट्रोल