जागतिक महिला दिवस उत्साहात
By Admin | Updated: March 9, 2016 02:54 IST2016-03-09T02:54:47+5:302016-03-09T02:54:47+5:30
जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सरपंच सुजीत येवले यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

जागतिक महिला दिवस उत्साहात
रावणवाडी : येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी (दि.८)
जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सरपंच सुजीत येवले यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपसरपंच कैलाश कुंजाम, कौशल लिल्हारे, कल्पना लिल्हारे, उर्मिला फसफासे, लीना गजभिये, सुरेखा बिसेन, सरिता न्यायकडे सुरेखा उपासे व रेखा हरिणखेडे, मानीक उके, खेमचंद हरिणखेडे उपस्थित होते.
गोंदिया : जेतवन बुद्ध विहार समितीच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले व माता रमाई यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करुन दीप प्रज्वलीत करण्यात आली. यावेळी महिलांनी पुष्प अर्पण केले. ललिता बोंबार्डे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आजची स्त्री, नवीन आव्हान पेलण्याची शक्ती, बदलते सांस्कृतिक जीवन, बदलती कार्यशक्ती, बदलते वास्तविक मूल्य, मैत्रिय भाव याविषयी मार्गदर्शन केले.
बाराभाटी : महिलांना मिळणारे हक्क, स्वातंत्र्य व अधिकार हे भारतीय संविधनामुळे मिळाले आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जागे होणे महिलांसाठी आवश्यक असलयाचे प्रतिपादन अॅड.प्रांजली भांडारकर यांनी केले. येथे आयोजित महिला दिन कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी वीणा नानोटी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून स्वाती हवेले, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी पौर्णिमा शहारे, नगराध्यक्ष डॉ. मेघा गाडेकर, जयश्री काशीवार, गीता ब्राम्हणकर, अनुजा पाटी, सी.एस. घाटे आदी महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी डॉ. गाडेकर यांनी, महिलांनी आरोग्यबाबत कशी दखल घ्यावी, काळजी कशी घ्यायची यावर मार्गदर्शन केले. तर उपस्थित अन्य पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. संचालन करून आभार नेहा कापगते यांनी मानले.
शिरपूरबांध : ग्राम पंचायत कार्यालयात जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच मदनसिंग पुंडकी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.पं.सदस्य अनुकला कोडापे, गजानन शिवणकर, किरण मेश्राम, अंगणवाडी सेविका रुपा देशमुख व माजी ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते. अध्यक्षांनी आपल्या भाषणात महिलांच्या स्थितीविषयी व त्यांच्या अधिकार कर्तव्याबाबत जागृत राहावे असे सांगितले.