उपजिल्हा रुग्णालयात मौखिक आरोग्य सप्ताह साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST2021-03-29T04:16:51+5:302021-03-29T04:16:51+5:30
तिरोडा : येथील उप जिल्हा रुग्णालयात मौखिक आरोग्य दिनाचा कार्यक्रम २० मार्च रोजी घेण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत ...

उपजिल्हा रुग्णालयात मौखिक आरोग्य सप्ताह साजरा
तिरोडा : येथील उप जिल्हा रुग्णालयात मौखिक आरोग्य दिनाचा कार्यक्रम २० मार्च रोजी घेण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला व ४० जणांची दंत तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, त्यानंतर २२ मार्चपासून मौखिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात आला.
यांतर्गत, येथील माजी सैनिक सभागृहात माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचे दंत परीक्षण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मेश्राम व दंत चिकित्सक डॉ. सुनीता थटेरे यांनी मौखिक आरोग्याबाबतची माहिती, मुखरोगांवरील उपचार पद्धतींवर मार्गदर्शन केले. तसेच दात व हाडांच्या आरोग्याकरिता आवश्यक पोषक आहारांविषयी माहिती आहारतज्ज्ञ श्रीमती सरोज नागदेवे यांनी दिली. या कार्यक्रमाला माजी सैनिक अध्यक्ष राजाराम पटले, कोषाध्यक्ष श्रावण भेलावे, सचिव धनेंद्र चौधरी मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. २३ तारखेला ३० रुग्णालयीन कर्मचारी व २४ खाजगी परिचारिका प्रशिक्षण व विद्यालयातील विद्यार्थिनींची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांची स्लोगन व निबंध स्पर्धा घेण्यात आली.
२४ तारखेला रुग्णालयात महिलांसाठी समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला. २५ तारखेला तहसील कार्यालयात दंत चिकित्सक डॉ. थटेरे यांनी नायब तहसीलदार अप्पासाहेब व्हनकड व नागपुरे आणी २३ कर्मचाऱ्यांची दंत तपासणी, करून मौखिक आरोग्याची माहिती व मुखरोगांवरील उपचार पद्धतींविषयी सांगितले. आवश्यक पोषक आहाराविषयी माहिती आहारतज्ज्ञ नागदेवे यांनी दिली. कार्यक्रमाचा समारोप तंबाखू विरोधी शपथ घेऊन करण्यात आला. २६ तारखेला मेरिटोरियस पब्लिक स्कूलमध्ये शाळा संचालक महेश अग्रवाल व प्राचार्य तुषार येरपुडे यांच्या सहकार्याने जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त घेतलेल्या पोस्टर स्पर्धेतील प्रथम वैैदेही देशमुख, द्वितीय गंधर्व भगत व तृतीय आर्यमन हिरापुरे आणी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम अश्विन अंबुले व द्वितीय स्वरूप संगजुडे यांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाला एकूण ३० विध्यार्थी व ९ शिक्षकगण उपस्थित होते. ज्यांना डॉ. थटेरे यांनी मौखिक आरोग्य व मुखरोगांवरील उपचारांबाबत सांगितले. डॉ. प्रणव डेंगरे, डॉ. प्रिया ताजणे यांनी मार्गदर्शन केले.
२७ तारखेला सी. जे. पटेल महाविद्यालयात डॉ. आर.एम. बनसोड, डॉ. व्ही. बी. अग्रवाल, डॉ. व्ही.व्ही. गायकवाड, प्राध्यापक शेख व प्राध्यापक अजय वखाले यांच्या विशेष सहकार्याने जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त घेतलेल्या पोस्टर स्पर्धेत प्रथम अंकिता निनावे, द्वितीय भूमिका रहांगडाले व तृतीय मौसमी पटले आणी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम भूमिका रहांगडाले, द्वितीय अंकिता निनावे व तृतीय मौसमी पटले यांना पारितोषिक देण्यात आले. तसेच ३ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमांसाठी डॉ. शीतल खंडेलवाल, डॉ. प्रांजला पेटकर व मुख्य अधिपरिचारिका शिप्रा तिराळे, समुपदेशक गणेश तायडे, गिरीदास गिरीपुंजे, रीता कोल्हटकर यांच्यासह सर्व परिचारिका तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.