नियमाचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:34 IST2021-09-07T04:34:47+5:302021-09-07T04:34:47+5:30
सडक अर्जुनी : गणेश उत्सवादरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून शासनाने दिलेल्या दिशा निर्देशाचे काटेकोरपणे पालन करून अत्यंत साधेपणाने ...

नियमाचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा
सडक अर्जुनी : गणेश उत्सवादरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून शासनाने दिलेल्या दिशा निर्देशाचे काटेकोरपणे पालन करून अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करा, तसेच नागरिकांना अवाजवी वर्गणी न मागता, विनाकारण डीजे, मोठे पंडाल न उभारता, मिरवणुका न काढता, गणेश मूर्तीचे विसर्जन नदी किंवा तलावात न करता कृत्रिम तलाव तयार करून त्यात करावे, असे ठाणेदार सचिन वांगळे यांनी सांगितले.
डुग्गीपार पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.४) गणेशोत्सवाला घेऊन गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने रुग्णांत वाढ होत आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गणेशमूर्तीची स्थापना करून गणेश उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन करून प्रोत्साहित करण्यात आले. बैठकीला पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, सपोनि संजय पांढरे, तसेच पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.