सीबीएसईत गोंदियाचा कोहीनूर मेश्राम प्रथम

By Admin | Updated: May 26, 2015 01:48 IST2015-05-26T01:48:27+5:302015-05-26T01:48:27+5:30

सीबीएसईच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत स्थानिक गोंदिया सिनीयर सेकेंडरी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

CBSE's Gondiya Kohenoor Meshram first | सीबीएसईत गोंदियाचा कोहीनूर मेश्राम प्रथम

सीबीएसईत गोंदियाचा कोहीनूर मेश्राम प्रथम

गोंदिया : सीबीएसईच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत स्थानिक गोंदिया सिनीयर सेकेंडरी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या परीक्षेला जिल्ह्यातून केवळ गोंदिया पब्लिक स्कूलमधून २६ विद्यार्थी बसले होते. यात कोहीनूर मेश्राम याने ९५ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
याशिवाय सौरभ चौरेवार याने ९३.२ टक्के, यश जयस्वालने ८६.८ टक्के, रोहीत रिनायतने ८५.८ टक्के, तर आयुष चतुर्वेदी याने ७५ टक्के गुण घेऊन प्राविण्य सूचित आपले नाव नोंदविले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी इंदिरा सपाटे, अर्जुन बुद्ध यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

इंजिनियर व्हायचंय
आपण संगणक क्षेत्रातील अभियंता होणार असल्याचे कोहीनूरने या यशानंतर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मला संशोधन करायला आवडते. अभ्यास केल्यानंतर तो आठवणीत ठेवण्यासाठी लिहून पाहावे. त्यामुळे ते अधिकवेळ स्मरणात राहते. दररोज चार ते पाच तास अभ्यास करायचो, असे त्याने सांगितले. शाळेतील उत्तम मार्गदर्शकांमुळे चांगले गुण घेता आले. पुढे प्रगती करण्यासाठी जीद्द व चिकाटीने अभ्यास करणार, असे कोहीनूर म्हणाला.

Web Title: CBSE's Gondiya Kohenoor Meshram first