सीबीएसई दहावीत १०० टक्के उत्तीर्ण

By Admin | Updated: May 20, 2014 23:42 IST2014-05-20T23:42:11+5:302014-05-20T23:42:11+5:30

यावर्षीच्या दहावी (सीबीएसई बोर्ड) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यात गोंदियातील चारही शाळांचे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे साकेत पब्लिक

CBSE scores 10-15 per cent | सीबीएसई दहावीत १०० टक्के उत्तीर्ण

सीबीएसई दहावीत १०० टक्के उत्तीर्ण

गोंदिया : यावर्षीच्या दहावी (सीबीएसई बोर्ड) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यात गोंदियातील चारही शाळांचे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे साकेत पब्लिक स्कूल या शाळेने तीन विद्यार्थी विदर्भात पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. अवधूनत शिक्षण संस्थेद्वारा संचालित साकेत पब्लिक स्कूलने यावर्षी जिल्हयात अव्वल स्थान पटकावले. भारती बजाज, मानसी खंडेलवाल आणि आयुष खंडेलवाल यांनी विदर्भात नाव कमावले. याशिवाय योगिता बजाज, प्रफुल्ल रहांगडाले, दीपशिखा जेना, आशिष पृथ्यानी, अमित पृथ्यानी, साहिल चिमनानी, अक्षत अग्रवाल, प्रशिक रणदिवे, साहिल चिमनानी, अक्षत अग्रवाल, प्रणाली कुथे, प्रतिक हरिणखेडे, सृष्टी चिंदालोरे, आदेश येवले यांनी ९० टक्केपेक्षा अधिक गुण घेतले. शिवाय गोंदिया पब्लिक स्कूल, प्रोग्रेसिव्ह स्कूल आणि सेंट झेव्हियर यांचाही निकाल १०० टक्के आहे.

Web Title: CBSE scores 10-15 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.