सावधान... कोरोना गाठतोय पुन्हा तीन आकडी आकडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 22:28 IST2021-03-27T22:28:05+5:302021-03-27T22:28:34+5:30
जिल्ह्यात शनिवारी (दि.२७) १०० कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. शनिवारी आढळलेल्या १०० बाधितांमध्ये ४१ कोरोनाबाधित गोंदिया, तर २९ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आहेत. तिरोडा ११, गोरेगाव १, आमगाव ८, देवरी ६, सडक अर्जुनी १ व बाहेरील राज्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. मागील आठ दिवसांपासून शहरी भागासह आता ग्रामीण भागातसुध्दा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

सावधान... कोरोना गाठतोय पुन्हा तीन आकडी आकडा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील तीन महिने आटोक्यात असलेली कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा तीन आकडी संख्या गाठत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाला वेळीच प्रतिबंध लावण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा जिल्हावासीयांना पुन्हा लॉकडाऊन तोंड द्यावे लागू शकते.
जिल्ह्यात शनिवारी (दि.२७) १०० कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. शनिवारी आढळलेल्या १०० बाधितांमध्ये ४१ कोरोनाबाधित गोंदिया, तर २९ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आहेत. तिरोडा ११, गोरेगाव १, आमगाव ८, देवरी ६, सडक अर्जुनी १ व बाहेरील राज्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. मागील आठ दिवसांपासून शहरी भागासह आता ग्रामीण भागातसुध्दा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आमगाव, तिरोडा, अर्जुनी मोरगाव या तालुक्यांमध्ये सातत्याने कोरोनाबाधितांचा आलेख वाढत आहे. ही धोक्याची घंटा असून वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. मागील तीेन महिन्यांच्या कालावधीत शनिवारी प्रथमच तीन आकडी कोरोनाबाधितांची नोंद झाली. हा वेग कायम राहिल्यास कोरोनाचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हावासीयांनी वेळीच सजग होण्याची गरज आहे. कोराेना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,००,९०४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८८,०१९ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ८५,८९४ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७९,३६१ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत १५,५२६ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १४,६५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६८४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ३८६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णसंख्येत वाढ
कोरोनाचा संसर्ग लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी दररोज कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात दररोज ३ हजारांवर कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
६५ हजार नागरिकांना दिली लस
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना लसीकरण केले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ६५ हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
प्रा. आ. उपकेंद्रातही होणार लसीकरण
केंद्र सरकारने १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत लसीकरणाला गती देण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्येसुध्दा लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील सूचना संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांना दिल्या आहेत