कत्तलखान्यात जाणाऱ्या १६ जनावरांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST2021-02-05T07:48:05+5:302021-02-05T07:48:05+5:30
एका मिनीडोरमध्ये (क्र. सीजी ०८ एल ०४१९) ५ गायी, ८ गोऱ्हे, ३ रेडे अशी १६ जनावरे डांबून कत्तलखान्यात नेली ...

कत्तलखान्यात जाणाऱ्या १६ जनावरांना पकडले
एका मिनीडोरमध्ये (क्र. सीजी ०८ एल ०४१९) ५ गायी, ८ गोऱ्हे, ३ रेडे अशी १६ जनावरे डांबून कत्तलखान्यात नेली जात होती. तर या गाडीला घेऊन जात असताना पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी ५ आरोपी मारूती झेन कार (क्र. एमएच ०२ एमए ९३८७) मधून सोबत जात होते. दोन्ही वाहनांना पोलीस शिपाई कमलेश शहारे यांनी पकडले. यात ४८ हजार रुपये जनावरांची, दोन लाख रुपये मिनीडोर तर ३० हजार रुपये कारची किंमत सांगितली जात आहे. पोलिसांनी वाहन व जनावरांना जप्त केले असून, पाच आरोपींवर चिचगड पोलीस ठाण्यात प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१), (ड), सहकलम ५ (अ), ६, ९ (अ) महाराष्ट्र पशुधन अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक फौजदार सौंजाळ करीत आहेत.