गुरे वाहून नेणारे वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:19+5:302021-03-18T04:28:19+5:30
अर्जुनी मोरगाव : निर्दयतेने दोन वाहनांत १२ गुरे अवैधरीत्या कोंबून नेताना अर्जुनी मोरगाव पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई वडसा-कोहमारा ...

गुरे वाहून नेणारे वाहन पकडले
अर्जुनी मोरगाव : निर्दयतेने दोन वाहनांत १२ गुरे अवैधरीत्या कोंबून नेताना अर्जुनी मोरगाव पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई वडसा-कोहमारा मार्गावरील अर्जुनी मोरगावच्या हिमालय बारसमोर मंगळवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास करण्यात आली. भंडारा जिल्ह्याच्या पिंपळगाव सडक येथील निरमल गौ संरक्षण केंद्रात गुरांची रवानगी करण्यात आली.
अर्जुनी मोरगावचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भुते हे हायवे दरोडा पेट्रोलिंग करीत असताना वडसा-कोहमारा मार्गाने गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार हिमालय बारसमोर नाकाबंदी करण्यात आली. अडीच वाजताच्या सुमारास कोहमाराकडून वडसाच्या दिशेने जाणारी दोन पिकअप वाहने दिसून आली. दोन्ही वाहनांची पाहणी केली असता त्यात प्रत्येकी सहा अशी एकूण १२ गुरे आढळून आली. वाहनांचे वैध दस्तऐवज नव्हते. ही गुरे चंद्रपूर येथील बाजारात विकण्यासाठी नेत असल्याचे वाहन चालकांनी सांगितले. गुरे वाहून नेणारे वाहन क्र. एमएच ३५ - एजे १९९६ व एमएच ३४ - बीजी १००५ ही दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली. उमेश भोंडेकर याच्या सांगण्यावरून आरोपी राधेलाल दुकलू मोहबे (५२), प्रमोद राजकुमार मोहबे (३०, रा. आमगाव), उद्धव मयाराम वाघाडे (३७), विकास आनंदराव भोंडे (२३, रा. सातलवाडा - साकोली), मनोज देवराम चांदेकर (रा. परसोडी) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ४ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला. पुढील तपास पोलीस नायक बोरकर करीत आहेत.