कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढणार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST2021-03-06T04:28:33+5:302021-03-06T04:28:33+5:30
गोंदिया : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न व समस्या निकाली काढण्यासंदर्भात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्त्वात सहाय्यक ...

कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढणार ()
गोंदिया : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न व समस्या निकाली काढण्यासंदर्भात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्त्वात सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण गिरीपुंजे यांच्या दालनात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची बैठक झाली. या बैठकीत कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यावर चर्चा करण्यात आली.
गट शिक्षणाधिकारी निलकंठ सिरसाटे, सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय बनकर, बालविकास विस्तार अधिकारी कुसुम सिरसाम, पशुसंवर्धन पर्यवेक्षक ए.के.डेकाटे व वरिष्ठ लिपिक प्रदिप मेंढे उपस्थित होते. यावेळी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी ७ वे वेतन आयोगान्वये आपले अधिनस्त असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे आश्वासन प्रगती योजना अंतर्गत १०,२० व ३० वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाखांची सुधारित प्रगती योजना १ जानेवारी २०१६ पासून लागू करणे संदर्भात कार्यवाही करण्यात यावी. आपले अधिनिस्त असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन वेळेवर करण्यात यावे, जिल्हा परिषद शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव अविलंब जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठविण्यात यावे, जिल्हा परिषद शिक्षकांच्या सेवापुस्तिका सहावे व सातवे वेतन आयोगाच्या मंजुरीसाठी जि. प. गोंदिया येथे त्वरीत पाठविण्यात यावे. वैद्यकीय प्रतिकृती देयके अविलंब जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठविण्यात यावे. शिक्षकांचे दुय्यम सेवापुस्तक तयार करुन अद्यावत करावे. सर्व विभागातील कर्मचारी, शिक्षक व अधिकारी यांचे मासिक वेतन व मानधन नियमित करणे संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी आदी विषयावर चर्चा करण्यात आली. समस्या प्राधान्याने निकाली काढण्याचे आश्वासन गट विकास अधिकारी यांनी दिले. शिष्टमंडळात शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, कर्मचारी महासंघाचे, जिल्हा कोषाध्यक्ष सिद्धार्थ भौतमांगे, जिल्हा संघटन सचिव अरविंद साखरे, जिल्हा संघटक तेजराम गेडाम, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित रामटेके, कर्मचारी महासंघाच्या तालुकाध्यक्षा नम्रता रंगारी, एम. बी.नंदागवळी, डी.आर. अंबादे, रविंद्र शहारे यांचा समावेश होता.