कॅशलेस व्यवहार फायद्याचे
By Admin | Updated: January 2, 2017 00:46 IST2017-01-02T00:46:21+5:302017-01-02T00:46:21+5:30
शासनाने रोख स्वरूपात होत असलेले व्यवहार कमी करण्यासाठी आता कॅशलेस हे नवे माध्यम पुढे आणले आहे. कॅशलेसच्या माध्यमातून होणारे व्यवहार

कॅशलेस व्यवहार फायद्याचे
नगराध्यक्ष बिसेन यांचे आवाहन : कॅशलेस व्यवहारांवर मार्गदर्शन कार्यशाळा
देवरी : शासनाने रोख स्वरूपात होत असलेले व्यवहार कमी करण्यासाठी आता कॅशलेस हे नवे माध्यम पुढे आणले आहे. कॅशलेसच्या माध्यमातून होणारे व्यवहार पूर्णपणे पारदर्शी राहणार असून सर्वसामान्यांसाठी फायद्याचे व सुरक्षीत राहणार असल्याने जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस करावे असे आवाहन नगर पंचायत अध्यक्ष सुमन बिसेन यांनी केले.
शहरात नवीन वर्षापासून प्रत्येक व्यापाऱ्यांनी ग्राहकांशी रक्कम देवाण-घेवाणचे काम पूर्ण कॅशलेस सिस्टीमद्वारे कशाप्रकारे या संबंधात नगर पंचायतच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी फार्मसी कॉलेजच्या सभागृहात शुक्रवारी (दि.३०) घेण्यात आलेल्या कॅशलेस व्यवहारांवरील कार्यशाळेत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. याप्रसंगी उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, नगरसेवक रितेश अग्रवाल, नगरसेविका दविन्दर कौर भाटीया, बँक आॅफ महाराष्ट्राचे बँक वितरक मुकेश सेलारे, बँक मित्र नाजीम शेख यांच्यासह शहरातील व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे आणि बँक कर्मचाऱ्यांनी १ जानेवारीपासून व्यापाऱ्यांनी ग्राहकांशी यु.पी.आय., ई-वॉलेट, आधार कार्ड अॅनाबॅलेड पेमेंट सिस्टम, यु.एस.एस.डी.कार्ड आणि पी.वो.एस. या सिस्टीमद्वारे रकमेचे देवाण घेवााण कशाप्रकारे करावे याबाबद योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्राहक व व्यापाऱ्यांनी कॅशलेस सिस्टिम द्वारे कशाप्रकारे करावे याकरिता नगर पंचायतच्यावतीने सात-आठ दिवसात १० ते १५ युवकांची प्रशिक्षित चमू शहरात फिरुन ग्राहक व व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष रुपात मार्गदर्शन करतील. यात फक्त व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात आॅनलाईन पेमेंट स्विकारले जाते असे फलक लावून त्यात आपले नाव, आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद असणे अनिवार्य असल्याचे मुख्याधिकारी चिखलखुंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी उपस्थित व्यापाऱ्यांनी पूर्ण व्यवहार कॅशलेस सिस्टमद्वारे करण्याकरिता एक महिन्यापासून बँकेत स्वाईप मशिनची मागणी करुन सुद्धा ती मशिन बँकेने उपलब्ध करुन दिलेली नाही. तरी ती मशिन बँकेत त्वरित उपलब्ध करुन द्यावी.
तसेच या कॅशलेस सिस्टमद्वारे व्यवहार करीत असताना शासनाने ग्राहक व व्यापाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेवू नये अशी मागणी या कार्यशाळेच्या माध्यमातून उपस्थित व्यापारी वर्गाने केली. आभार नगराध्यक्ष बिसेन यांनी मानले. (प्रतिनिधी)