जुगार खेळणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:26 IST2021-04-14T04:26:20+5:302021-04-14T04:26:20+5:30

गोंदिया : शाळेसमोरील मोकळ्या जागेत बसून जुगार खेळत असलेल्या जुगाऱ्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडील ८६ हजार ९३० रुपयांचा ...

Case registered against 5 gamblers | जुगार खेळणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल

जुगार खेळणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल

गोंदिया : शाळेसमोरील मोकळ्या जागेत बसून जुगार खेळत असलेल्या जुगाऱ्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडील ८६ हजार ९३० रुपयांचा माल जप्त केला असून, ५ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. रविवारी (दि.११) दुपारी ३.२० वाजतादरम्यान ही कारवाई करण्यात आली.

आरोपी जय किशन जियालाल शेंद्रे (२४,रा. पैकनटोली, बजाज वाॅर्ड), केतन राधेशाम ठाकरे (३३,रा. पैकनटोली, बजाज वॉर्ड ), आकाश उमेश जगणे (३३), शुभम रिंकूसिंग बैस (२३, रा. गौतमनगर) व महेश ग्यानिराम नेवारे (३५, रा.पैकनटोली, बजाज वाॅर्ड ) हे बजाज वाॅर्ड पिंडकेपार रोड येथील शाळेच्या समोरील मोकळ्या जागेत जुगार खेळत असताना, पोलिसांनी धाड घालून त्यांना रंगेहात पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडील ९३० रुपये रोख, २ मोबाइल व १ मोटारसायकल क्रमांक एम.एच. ३५ ए.एम. ४४१८ असा ८६ हजार ९३० रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस शिपाई विकास वेदक यांनी केली आहे. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Case registered against 5 gamblers