टिप्पर अडवून रेती खाली करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST2021-05-12T04:30:31+5:302021-05-12T04:30:31+5:30

टिप्पर एम.एच.४० बीएल १००८ ला अडवून त्या टिप्परमधील रेती मोकळ्या जागेत खाली करण्यासाठी टिप्पर चालक अतुल मनोज राऊत (२६) ...

A case has been registered against seven persons for obstructing a tipper and taking down sand | टिप्पर अडवून रेती खाली करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल

टिप्पर अडवून रेती खाली करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल

टिप्पर एम.एच.४० बीएल १००८ ला अडवून त्या टिप्परमधील रेती मोकळ्या जागेत खाली करण्यासाठी टिप्पर चालक अतुल मनोज राऊत (२६) रा. निलागोंदी याला आरोपी मनीष कुमार रामानंद वर्मा (४६) रा. कृष्णपुरा वॉर्ड गोंदिया, कार्तिक चव्हाण नागज्योती (३०) राख. यादव चौक गोंदिया, संदीप ऊर्फ दस्सू पुरनलाल यादव (३७) रा. यादव चौक गोंदिया, योगेश नरेश श्यामकुवर (२८) रा. झोपड्डी मोहल्ला गोंदिया, सुशांत ऊर्फ कान्हा मुन्नालाल यादव (३४) रा. कृष्णपुरा वॉर्ड गोंदिया, विज बिसलाल चंदनिया (४१) रा. आंबेडकर स्कूल जवळ यादव चौक गोंदिया व अन्य एक अशा सात जणांनी अतुल राऊतला बेदम मारहाण केली. आरोपींनी टिप्पर टिप्पर एम.एच.४० बीएल १००८ मध्ये चार ब्रास रेती होती. वाहन चालकाला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना ९ मे च्या रात्री ८ वाजता दरम्यान घडली. अतुल मनोज राऊत (२६) रा.निलागोंदी यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ३२३,२९४,३४१,३९५,५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात मनिषकुमार वर्मा व कार्तिक नागमोती या दोघांना अटक केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ करीत आहेत.

Web Title: A case has been registered against seven persons for obstructing a tipper and taking down sand