शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भरधाव कंटेनरची ट्रकला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:05 IST

भरधाव कंटेनरने ट्रकला धडक दिल्याने दोन चालकांसह क्लीनर असे तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.१) रात्री ११.३० ते ११.४५ वाजताच्या दरम्यान नवेगावबांध-कोहमारा मार्गावरील येथील नाक्याजवळ घडली.

ठळक मुद्देअपघात : दोन चालकांसह क्लीनर गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : भरधाव कंटेनरने ट्रकला धडक दिल्याने दोन चालकांसह क्लीनर असे तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.१) रात्री ११.३० ते ११.४५ वाजताच्या दरम्यान नवेगावबांध-कोहमारा मार्गावरील येथील नाक्याजवळ घडली.रविवारी रात्री अर्जुनी-मोरगावकडून कोहमाऱ्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने एच. आर. ३८/यु-५२४१ कोहमाऱ्याकडून अर्जुनी-मोरगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला सी.जी.०४/जे.सी.-८१९६ समोरासमोर येथील कोहमारा मार्गावर नाक्याजवळ धडक दिली. यात कंटेनर चालक चंदन अरुण सिंग (२१) रा. सदपूर (बिहार) याच्या डाव्या पायाचा पंजाच तुटला. तर ट्रक चालक जागेश्वर पतिराम परतेकी (३५) रा. रेंगेपार दल्ली यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले व जबर दुखापत झाली. तसेच ट्रकचा क्लिनर गुरुदेव वासुदेव तुमडाम (२२) रा. बोळदे-करड याच्या डोक्याला मार लागल्याने जखमी झाला.फिर्यादी गुरुदेव वासुदेव तुमडाम यांनी नवेगावबांध पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींना नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ.योगेंद्र यादव, डॉ.सचिन लंजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींवर ताबडतोब उपचार केला. जागेश्वर परतेकी व चंदन अरुण सिंग यांची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन त्यांना सामान्य रुग्णालय भंडारा येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.कंटेनर चालक चंदन अरुण सिंग याच्यावर निष्काळजीपणा व हयगयीने वाहन चालविण्याचा ठपका ठेऊन भादंविच्या २७९, ३३७, ३३८ व मोवाका १८४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

टॅग्स :Accidentअपघात