प्रतापगडला जाणारी कार गेली पुलाखाली
By Admin | Updated: February 20, 2015 01:22 IST2015-02-20T01:22:44+5:302015-02-20T01:22:44+5:30
महाशिवरात्री पर्वावर प्रतापगडच्या यात्रेत दर्शनासाठी जाणारी नागपूर जिल्ह्यातील एक सॅन्ट्रो कार (एमएच ३१/सी.व्ही.-४०७१)

प्रतापगडला जाणारी कार गेली पुलाखाली
अर्जुनी-मोरगाव : महाशिवरात्री पर्वावर प्रतापगडच्या यात्रेत दर्शनासाठी जाणारी नागपूर जिल्ह्यातील एक सॅन्ट्रो कार (एमएच ३१/सी.व्ही.-४०७१) एका वळणावर छोट्याशा पुलाखाली उतरली. या अपघातात तिघे जखमी झाले. त्यांना साकोली येथे उपचारासाठी हलविण्यात आले. हा अपघात गुरूवारी (दि.१९) ला दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार, धंतोली नागपूर येथील बलविंदरसिंग सड्डल (५२), दुर्गेश कौर (३८), सिमरन सड्डल (२०) व एक लहान चिमुकला हे सॅन्ट्रो वाहनाने प्रतापगडला जात असताना एका वळणावर त्यांची कार अनियंत्रित झाली आणि ती पुलात घुसली. कारचे एक चाक पुलावर तर इतर चाके पुलाखाली होती.
या अपघातात बलविंदरसिंग यांची छाती व हाताला दुखापत झाली तर दुर्गेशच्या डोक्याला किरकोळ जखम झाली. (तालुका प्रतिनिधी)
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दाखविली कार्यतत्परता
अर्जुनी मोरगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गुज्जनवार हे या मार्गाने जात असताना त्यांना अपघातग्रस्त वाहन दिसले. लागलीच सर्व जखमींना त्यांनी आपल्या वाहनात घेतले व त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे घेऊन गेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना शासकीय रुग्णवाहिकेतून साकोली येथे नेण्यात आले.