कत्तलखान्यात जाणारा जनावरांचा ट्रक पकडला
By Admin | Updated: April 20, 2017 01:07 IST2017-04-20T01:07:03+5:302017-04-20T01:07:03+5:30
रात्र गस्त घालणाऱ्या पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारच्या पहाटे २ वाजता कत्तलखान्यात

कत्तलखान्यात जाणारा जनावरांचा ट्रक पकडला
२६ जनावरांची मुक्तता : विशेष पथकाची कारवाई
गोंदिया : रात्र गस्त घालणाऱ्या पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारच्या पहाटे २ वाजता कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांच्या एका ट्रकला पकडण्यात आले. त्या ट्रकमधून २६ जनावरांची मुक्तता करण्यात आली.
पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, सहाय्यक फौजदार करपे, शेंडे, डोंगरे, डोंगरवार व काटेंगा हे गस्त घालत असताना नवेगावबांध च्या टी पार्इंटवर ट्रक एमएच ४९ ०७८६ मध्ये २६ जनावरे कोंडून कत्तलखान्यात नेणाऱ्या ट्रकला विशेष पथकाने पकडले. त्या जनावरांची मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात आरोपी शेख बब्बु शेख मुसा (३४) रा. यशोधरा नगर नागपूर, शेख खलीद उर्फ गोलू शादी कुरेशी (२०) व शेख रफीक सत्तार कुरेशी (२०) दोन्ही रा. आझाद नगर टेकनाई बस्ती नागपूर यांना अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या जनवातांची किंमत एक लाख ६४ हजार तर ट्रकची किंमत १२ लाख रूपये सांगितली जाते. आरोपींविरूध्द महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम कलम ६,९, प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा कलम ८३, १७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)