एक हजार अपंगांना करणार सक्षम

By Admin | Updated: July 16, 2016 02:09 IST2016-07-16T02:09:46+5:302016-07-16T02:09:46+5:30

जिल्ह्यातील अपंगांसाठी राज्य शासनाने सर्वाधीक दोन कोटी मंजूर केले आहेत.

Capable of one thousand disabled | एक हजार अपंगांना करणार सक्षम

एक हजार अपंगांना करणार सक्षम

राजकुमार बडोले : पत्रपरिषदेत दिली माहिती
गोंदिया : जिल्ह्यातील अपंगांसाठी राज्य शासनाने सर्वाधीक दोन कोटी मंजूर केले आहेत. येत्या ३० जुलै रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजीक न्याय भवनात अपंगांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर एक हजार अपंगांना सक्षम बनविण्यासाठी उद्योगांकरीता कर्ज वितरण केले जाणार असल्याची माहिती राज्याचे सामाजीक न्याय व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (दि.१५) पत्रकारांशी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी अर्जुनी-मोरगाव येथे आॅगस्ट महिन्यात महासमाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगीतले. शासकीय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचत नसून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचाव्या यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी जिल्हाधिकारी तलाठी, पोलीस पाटील व ग्रामसेवकांना कामावर लावले आहे. यात विधानसभा क्षेत्रातील ३६० गावांतील ४० हजार लोकांचे अर्ज भरविले जात आहे.
यांतर्गत २४ जुलै रोजी सडक-अर्जुनी पंचायत समिती सभागृहात, २७ जुलै रोजी अर्जुनी-मोरगावच्या प्रसन्ना सभागृहात व ३० जुलै रोजी गोरेगाव यथे कॅम्प घेतले जाणार आहे. यासाठी तिन्ही तालुकास्थळांवरील तहसील कार्यालयात समाधान कक्षाची स्थापना करण्यात आली असून येत्या ८ आॅगस्ट पर्यंत अर्ज कक्षात द्यावयाचे आहेत. राज्यात २० हजार प्रमाणपत्र तयार करून देण्याचे कार्य पूर्वी काही जिल्ह्यांत झाले आहे. मात्र अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात ४० हजार प्रमाणपत्र तयार करून देणे हा एक नवीन रेकॉर्ड असणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी निवासी उप जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, अतिरीक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण
या महासमाधान शिबिरात तयार करण्यात येणारे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. हे शिबिर पूर्वी १६ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या तारखेनुसार आता तारीख ठरवीली जाणार आहे. विशेष म्हणजे या शिबिरात उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना पुरस्कृत केले जाणार असल्याचीही माहिती नामदार बडोले यांनी दिली.

 

Web Title: Capable of one thousand disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.