ई-रिक्षाचे खरेदीदार दुहेरी कर्जात

By Admin | Updated: August 31, 2016 00:23 IST2016-08-31T00:23:53+5:302016-08-31T00:23:53+5:30

ई-रिक्षा वाहन योग्य की अयोग्य, अशा द्विधा मन:स्थितीत सदर वाहनांचे चालक आहेत. परंतु आक्षेपार्ह

Buyers of e-rickshaws should double their debt | ई-रिक्षाचे खरेदीदार दुहेरी कर्जात

ई-रिक्षाचे खरेदीदार दुहेरी कर्जात

बन्सोड यांना निवेदन : कंपनी व डीलरवर कारवाई करण्याची मागणी
काचेवानी : ई-रिक्षा वाहन योग्य की अयोग्य, अशा द्विधा मन:स्थितीत सदर वाहनांचे चालक आहेत. परंतु आक्षेपार्ह वाहने बाजारात आणण्याची परवानगी देणारे व उत्पादन करणारे दोषी आहेत. ज्या जिल्ह्यात बंदी आहे, त्या जिल्ह्यात सदर वाहने कशी आलीत, ही महत्वपूर्ण बाब आहे. खरेदीदारांना याची जाणीव पूर्वीच करण्यात आली असती तर तिरोड्याचे १२ खरेदीदार फसले नसते. शासनाने नवीन योजना आखावी किंवा कंपनीला धारेवर धरून वाहनांची रक्कम परत करावी, यासाठी सहकार्य करा, अशा मागणीचे निवेदन माजी आमदार दिलीप बंसोड यांना ई-रिक्षा चालकांनी दिले आहे.
निवेदनानुसार, ई-रिक्षा डीलरने सर्व आवश्यक कागदपत्रे कंपनी तयार करून दोन महिन्यांत देणार आहे. कोणत्याही परवान्याची गरज पडणार नाही. या विश्वासावर कसेबसे रक्कम गोळा करून, कर्ज घेवून खरेदी केले. त्यावेळी गोंदिया जिल्ह्यात बंदीची जाणीव कुणालाही नव्हती, असे ई-रिक्षा चालकांनी सांगितले.
तिरोडा तालुक्यात सेवकराम लोहबरे यांचा ई-रिक्षा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया यांनी १२ आॅगस्ट २०१६ रोजी पकडून मोटार वाहन नियम १२६ ची कारवाई करून जप्त केले.
त्यामुळे इतर ११ ई-रिक्षा चालकांत भीती निर्माण झाली आहे. सेवकराम लोहबरे यांनी बचत गट व इतर व्यक्तींकडून १० टक्के व्याजाने रक्कम उचलून वाहन खरेदी केल्याचे लोकमतला सांगितले. तसेच माजी आ. दिलीप बंसोड यांना निवेदन देवून आपबिती सांगत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. यावर बंसोड यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेवून वास्तविकता तपासून काही मार्ग निघू शकेल का, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देतेवेळी ई-रिक्षा चालक सेवकराम लोहबरे, सुशीला लोहबरे, दलपत खरोदे, हफीज शेख, महेश चौधरी, पवन जीवतोडे, मोसीन खान, अमोल राऊत, संजय ढोरमारे, मजीत शेख, अमित अमृते, नरेश बरियेकर उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: Buyers of e-rickshaws should double their debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.