शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

उत्पादनापेक्षा दुप्पट धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 5:00 AM

धान खरेदी केंद्रावर ४० क्विंटल प्रती हेक्टर प्रमाणे केली असली तरी प्रत्यक्षात १ लाख ६९ हजार २०० क्विंटल धानाची खरेदी विक्री अपेक्षित होती. परंतु तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीची गोळा बेरीज केली असता अपेक्षेपेक्षा दुप्पट धान खरेदी झाली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेश्नचे दोन खरेदी केंद्र आणि आदिवासी महामंडळाचे एकूण सात केंद्र असे एकूण नऊ धान खरेदी केंद्राचा यात समावेश आहे.

ठळक मुद्देखरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांच्या धानाची विक्री : सातबाराची तपासणी केल्यास होणार खुलासा

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामात साडेतीन तीन लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. तर तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्राचा विचार करता केवळ पावने दोन लाख क्विंटल धान खरेदी होणे अपेक्षित असताना तब्बल साडेतीन लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. त्यामुळे उत्पादन वाढले नसताना खरेदीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या सातबारावर व्यापाºयांनी धानाची विक्री केल्याची बाब आता पुढे आली आहे. याची चौकशी केल्यास यातील गौडबंगाल उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.सालेकसा तालुक्यात धान लागवडीचे एकूण क्षेत्र जवळपास १६ हजार हेक्टर आहे. यापैकी दरवर्षी काही भागात रब्बी हंगामातील उन्हाळी धानपिक घेण्यात येते. यंदा पुजारीटोला, बेवारटोला धरण व इतर लघु प्रकल्पातून उन्हाळी धानपिक घेण्यासाठी पाणी देण्यात आले. काही खासगी बोअरवेलधारक शेतकऱ्यांनी सुद्धा उन्हाळी धानाची लागवड केली. सर्व मिळून तालुक्यात ४२३० हेक्टर ओलीताखालील क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली.गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामातील धान उत्पादनाची सरासरी हेक्टरी ३१.२५ क्विंटल एवढी आहे. रबी हंगामात थोड्याफार प्रमाणात उत्पादन वाढले असेल. याच पार्श्वभूमीवर सदर प्रतिनिधीने वेगवेगळ्या १० शेतकऱ्यांकडून उत्पादनाचे आकडे घेतले. त्याची सरासरी काढली असता यंदा हेक्टरी ३७.५० क्विंटल धानाचे कमाल उत्पादन रब्बी हंगामात झाले. धान खरेदी केंद्रावर हेक्टरी ४० क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात आली. रब्बी पिकाची वास्तविक सरासरी काढली तर १लाख ५८ हजार ६२५ क्विंटल धानाचे उत्पादन झाले.धान खरेदी केंद्रावर ४० क्विंटल प्रती हेक्टर प्रमाणे केली असली तरी प्रत्यक्षात १ लाख ६९ हजार २०० क्विंटल धानाची खरेदी विक्री अपेक्षित होती. परंतु तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीची गोळा बेरीज केली असता अपेक्षेपेक्षा दुप्पट धान खरेदी झाली आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेश्नचे दोन खरेदी केंद्र आणि आदिवासी महामंडळाचे एकूण सात केंद्र असे एकूण नऊ धान खरेदी केंद्राचा यात समावेश आहे.या नऊ धान खरेदी केंद्रावर एकूण ३ लाख ५० हजार ९३७ क्विंटल धान खरेदी झाली आहे. तर प्रती हेक्टर सरासरी ४० क्विंटल प्रमाणे ही धान खरेदी केली असली तरी यात १ लाख ८१ हजार ७३७ क्विंटल धान खरेदी अतिरिक्त झाली आहे.जवळपास पावने दोन लाख क्विंटल धान खरेदी तफावत आहे. त्यामुळे हे अतिरिक्त धान नेमके आले कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.खरेदी केंद्रावरील आकड्यानेच फुटले बिंगकेंद्रनिहाय धान खरेदी पहिली तर मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सहकारी भात गिरणी सालेकसा येथे एकूण १ लाख २६ हजार ५५२ क्विंटल उन्हाळी धानाची खरेदी झाली. याच अंतर्गत कोटजंभुरा येथील धान खरेदी केंद्रावर १ लाख १६ हजार ११० क्विंटल धान खरेदी झाली. अर्थात तालुक्यात मार्केटिंग फेडरेशनतर्फे २ लाख ४३ हजार ६६२ क्विंटल धान खरेदी झाली. तर आदिवासी विकास महामंडळ देवरी अंतर्गत तालुक्यातील एकूण सात सहकारी संस्थेच्या मार्फत धान खरेदी करण्यात आली. यामध्ये सालेकसा येथे ९ हजार ४४३.२४ क्विंटल, दरेकसा येथे १२ हजार ५५.६० क्विंटल, पिपरीया केंद्रावर दहा हजार २४४.६० क्विंटल, लोहारा केंद्रावर २० हजार १८२.१० क्विंटल, गोर्रे केंद्रावर १६ हजार ८०६.५८ क्विंटल, साखरीटोला केंद्रावर १९ हजार २८६.२० क्विंटल आणि मक्काटोला केंद्रावार १९ हजार २७५.४६ क्विंटल धान खरेदी झाली आहे. सर्वाधिक धान खरेदी मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदी केंद्रावर झाली आहे. या केंद्रावर व्यापाºयांनी धानाची विक्री केल्याची माहिती आहे.सातबाराची होणार का चाचपणीशासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा दाखविणे अनिवार्य आहे. त्याशिवाय धान खरेदी केली जात आहे. काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा फायदा घेत त्यांचे सातबारा गोळा करुन त्यांच्या नावावर धानाची विक्री केली. यात तलाठ्यांनी सुध्दा रब्बी धानाची लागवड केली नसताना त्यात धानाची लागवड केल्याची नोंद सातबारावर करुन दिल्याची माहिती आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावरील सातबारांची चाचपणी केल्यास वाढीव खरेदीचे बिंग फुटू शकते.शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या सातबारावर व्यापाऱ्यांनी धानाची विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची गांर्भियाने दखल घेत याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. अहवाल प्राप्त होताच दोषींवर कारवाई केली जाईल.- नाना पटोले,अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभात्यांना अभय नेमके कुणाचेशासकीय धान खरेदी केंद्रावर दलाल, व्यापारी बिनधास्तपणे आपल्या धान विक्रीची नोंद करवून घेतात. त्यांचे संबंध काही राजकीय नेत्यांशी सुध्दा आहे. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी ते या नेत्यांच्या नावाचा गैरफायदा घेत आहेत.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड