बाराभाटी-नागपूर बसमध्ये व्यावसायिकांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 00:18 IST2016-09-04T00:18:47+5:302016-09-04T00:18:47+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने प्रवाश्यांचा प्रवास सुखाचा जावो म्हणून महामंडळाने बाराभाटीपासून तर नागपूर ही बस गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.

Businessman's arbitrariness at Barabhatti-Nagpur bus | बाराभाटी-नागपूर बसमध्ये व्यावसायिकांची मनमानी

बाराभाटी-नागपूर बसमध्ये व्यावसायिकांची मनमानी

प्रवाशांना त्रास : बस कर्मचाऱ्यांची व्यावसायिकांनाच साथ
बाराभाटी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने प्रवाश्यांचा प्रवास सुखाचा जावो म्हणून महामंडळाने बाराभाटीपासून तर नागपूर ही बस गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र या बसमध्ये भाजीपाला विकणारे, फळ विकणारे या बस मधून प्रवास करतांना प्रवाश्यांना धमकावित असतात.
सदर बस पालांदूर-लाखनी-भंडारा आणि नागपूर या मार्गाने दररोज धावते. मात्र पालांदूर पासून या अनेक वस्तू साधने, जीवनावश्यक घटक विकणारे, व्यावसायीकांचा अरेरावीपणा, मालकी हक्कप्रमाणे इतरांशी अरेरावीने वागतात. या त्यांच्या मनमर्जी कारभारावर बस चालक-वाहक यांचे नियंत्रण नसून ते त्यांनाच सहकार्य करतात. यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रवास करताना मोठा त्रास होतोे.
सदर बसमध्ये मनमर्जी करणारे धंदेवाले भाजीपाले, वांगे, टमाटर कॅरेट, फळांचे कॅरेट आणि मोठमोठे सामानांचे गट्टे हे बसमध्ये मांडतात. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी त्रास होतो. परिणामी प्रवाश्यांत खाक्या उडतात. यावेळी मात्र बस कर्मचारी हे फक्त बघ्याची भूमिका घेतात. (वार्ताहर)

Web Title: Businessman's arbitrariness at Barabhatti-Nagpur bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.