भरधाव ट्रकची बस थांब्याला धडक

By Admin | Updated: November 1, 2016 01:27 IST2016-11-01T01:27:29+5:302016-11-01T01:27:29+5:30

रायपूरकडून नागपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्र. एमपी ०९, एचक्यू १११७ ने सकाळी ६ वाजता

The bus of Bhadhava truck collided with the stops | भरधाव ट्रकची बस थांब्याला धडक

भरधाव ट्रकची बस थांब्याला धडक

देवरी : रायपूरकडून नागपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्र. एमपी ०९, एचक्यू १११७ ने सकाळी ६ वाजता मरामजोब (मासुलकसा) येथील बसस्थानकाला जोरदार धडक दिली.
या घटनेत बसस्थानकाचा स्लॅब कोसळला असून यात ट्रकचालक गंभीर जखमी झाला.
प्राप्त माहितीनुसार, लोहा भरून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने नॅशनल हायवेला लागून असलेल्या मासुलकसा येथील पक्क्या बसस्थानकावर गाडी चढविली. याच बसस्थानकाला लागून असलेल्या दोन चहा दुकानाला सुद्धा या ट्रकने उध्वस्त केले.
ट्रक चालकास झोपेची डुलकी आल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचा तपास देवरी पोलीस करीत आहेत.

Web Title: The bus of Bhadhava truck collided with the stops